ह.भ.प ब्रम्हमुर्ती दामोदर बाबा यांचे निधन : बळसाणेगावासह माळमाथा परिसरात शोककळा त्र्यंबकेश्वर येथे अंत्यसंस्कार




   

 बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे या गावाशी बाल ब्रम्हचारी ह.भ.प. दामोदर बाबा यांचे इ.स. १९६४ या साला पासून गावकऱ्यांशी संबंध होते
   प्रखर व प्रसिद्ध किर्तनकार बालब्रम्हचारी ह.भ.प. दामोदर बाबा यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी व्रुध्दपाकळाने दुखद निधन झाले
 बाबांच्या निधनाने बळसाणे ग्रामस्थांसह माळमाथा भागातील नागरिक व वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे गेल्या दोन , तीन दिवसापासून बाबांवर ओझर जि.नासिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान ( ता. १५ ) पहाटे त्यांची प्राण ज्योत मालावली वणी पाचोरा जवळील खेडगाव हे दामोदर बाबांचे मुळ गाव
  बळसाणे गावकऱ्यांमध्ये व वारकरी संप्रदायात त्यांना मानाचे स्थान होता संत तुकाराम महाराज व स्वामी विवेकानंदांवर त्यांची नितांत श्रध्दा होती
 संत तुकाराम महाराज आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता समाजातील अंधश्रद्धा , बुवाबाजी व तरुणां विषयी ते त्यांच्या शब्दशैलीच्या माध्यमातून परखडपणे किर्तन करायचे त्यांच्या किर्तन ऐकण्यासाठी खांदेशातून भाविक व वारकऱ्यांची उपस्थिती हजारो च्या संख्येने राहायची
 बळसाणे व परिसरातील खेडोपाडी जाऊन त्यांनी विठ्ठल रुक्मिणी चे मंदिरे उभारली या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केली दामोदर बाबांनी बळसाणे गावात मार्च महिन्यात विठ्ठल रुक्मिणी च्या भव्य पटांगणात सप्ताह भरावयाची सुरुवात केली आणि या सप्ताहात बळसाणे करांना नामांकित व किर्तनकार तसेच प्रवचनकरांची उपस्थिती असायची
  राष्ट्र संत गाडगेबाबा , स्वामी विवेकानंद आणि संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज यांचा विचार आणि प्रबोधनाचा वारसा चालविला
 दामोदर बाबा यांनी अंधश्रद्धा , जादूटोणा आणि कर्मकांडावर आसूड ओढले जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे जीवन , चरित्र आणि गाथा यांच्या साध्या सोप्या भाषेत प्रचार , प्रसाद करतांना बळसाणेसह माळमाथा परिसरातील एक ही गाव सोडले नाही संत तुकाराम महाराज यांचे विचार जगाला तारु शकतात असा विश्वास बाबांनी जनमानसात रुजवला
 तुकाराम महाराजांचे चरित्र विक्रुतपणे समाजापुढे मांडणारांचा त्यांनी वेळोवेळी चांगलाच समाचार घेतला स्पष्ट वक्तेपणा आणि सोपी भाषा यामुळे बाबाच्या किर्तनाला भाविकांची मोठी उपस्थिती असायची
समाजातील अनेक वाईट रुढी परंपरा मोडीत लावली व वेशनाधीरांसाठी किर्तनाच्या परखड शैलीतून अनेकांना वारकरी संप्रदायात आणले अनेक कुटुंब वेशनापायी उध्वस्त होणार होती परंतु बाबांनी तशा कुटुबांना ऐनवेळी वाचवल्याचे बोलके चित्र आज ही आहे

 बाबाच करायचे शिष्यांसाठी स्वयंपाक

  वर्षाच्या गुरूपौर्णिमेला हजारो लोकांचा जनसमुदाय बाबांचा मठावर गुरुपुजनासाठी जात असे परंतु बाबा स्वतः च स्वयंपाक तयार करायचे व आपल्या शिष्यांसाठी मसाले भात व शिरा हा महाप्रसाद तयार करून खावू घालत असे


 बळसाणेसह माळमाथा परिसरातून भाविक त्र्यंबक कडे रवाना

 दामोदर बाबा यांच्या निधनाची बातमी सोशलमिडीयावर धडकताच अनेक भाविक बाबांना अंत्यविधी करिता त्र्यंबक कडे रवाना झाले 

 समाजप्रबोधनासाठी विठ्ठल मंदिर उभारली

 बळसाणे , ऐचाळे , हाट्टी , फोफरे , सतमाने , घानेगाव , सडगाव , नवलाने , गौताणे , सैताळे , नकुंभे , देवी  ईत्यादी ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे उभारली काही भाविकांचे आषाढी एकादशी ला पंढरपूर कडे जाण होत नसल्याचे पाहून बाबा आमच्या गावोगावात पंढरपूर च घेऊन आले आता आमुच्या गावांना प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते

 अंबरनाथा ची यात्रा बळसाणे करांची स्मरणात

 १९९७ मध्ये दामोदर बाबा यांनी दहा दिवसासाठी बळसाणे येथील भाविकांना चारोधाम यात्रेसाठी घेऊन गेले होते आज त्या बाबांनी घडवून आणलेली यात्रेची एक आठवण आली

बळसाण्याचा बाबा गेल्या ने हळहळ

 बळसाणे गावात लहाण्यापासून तर वयोवृद्धांपर्यंत बाबा नाव सर्वांच्या मुखात होते आणि आज आपला बाबा आपल्यात नसल्याचे दुख बळसाणे कराना होत आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने