शिरपूर - दि 14 रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असतांना गुपीत माहिती प्राप्त झाली त्या माहिती आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.सई संदीप मुरकुटे, योगेश कोळी,बापूजी पाटील,नरेंद्र शिंदे,स्वप्निल बांगर,अमित रनमळे,प्रविण गोसावी,मुजाहिद्दीन शेख आदी शोध पथकाने शिरपूर शहरा जवळील वाघाडी टी- पॉईंट जवळ सापळा रचून एक पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या संशयिताला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता.त्याचे नाव योगेश विजय शिंपी.रा.इंदिरा नगर शिरपूर असे सांगितले त्या संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे 15 हजार किंमतीची देशी बनावटीचा लोखंडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले.संशयित योगेश विजय शिंपी याच्या विरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags
news
