शहादा :- असलोद (ता.शहादा) येथील जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या धाडीत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली . असलोद येथील केदारसिंग भिलेसिंग गिरासे याच्या मालकीच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये झनामन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार पथकाने सोमवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास या ठिकाणी धडक कारवाई केली . दरम्यान या ठिकाणी मध्यप्रदेशासह शहादा व धुळे जिल्ह्यातील विविध भागातून अनेक जण जुगार खेळण्यासाठी आल्याचे दिसून आले . पोलीस पथकाने अचानक टाकलेल्या धाडीमुळे येथील जुगारीची एकच धावपळ उडाली . पोलीसांची धाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतमालक केदारसिंग गिरासे हा घटनास्थळावरून पसार झाला . येथून पोलीस पथकाने १ लाख ३५ हजार ३० रु रोख तसेच ४ लाख २० हजार ८३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला . यात जुगाराच्या साधनांसह मोटारसायकलींचा समावेश आहे . दरम्यान या ठिकाणी जुगार खेळणारे लक्ष्मण रामा अहिरे रा.शहादा , नितीन मुकेश चौधरी , पृथ्वीराज सोहनलाल खंडेलवाल , सुभाष मकडू मोरे , श्रीराम रतन देवरे , इंदर मधुकर अहिरे , शाम झिंगा माळी , सतीष किरण मोरे , ऋषीकेश लड्डू भोई . पंकज दिलीप पाटील , राहुल साहेबराव जगदेव , भूषण देविदास पाटील , इस्माईल उमर खाटीक , नईम भुरु बेग , मनीलाल कोंडू सोनिस , निजामुद्दीन रफीउद्दीन खाटीक , अनिल साहेबराव निकुंभ , भरत रोहिदास पाटील , राधेश्याम दौलत मराठे , धनंजय - विश्वास पाटील , आनंद रमण भोई , बिस्मिल्ला समसोहीन पिंजारी , कमलेश प्रेमचंद जैन , गुलाब राजाराम ठाकरे , रमेश भजन ठाकरे , आत्माराम मोतीराम भिल , भटू देवराम पाटील व शेतमालक केदारसिंग गिरासे यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कारवाई विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव , पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील , सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे , पोलीस नितीन सपकाळे , विश्वेश हजारे , दिपक ठाकूर , उमाकांत खापरे , नारायण लोहरे यांनी केली . घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहादा परिसरात महिनाभरात जुगार अड्यावर टाकण्याची ही दुसरी कारवाई .
Tags
news
