भडणे - तालुका शिंदखेडा येथील पोलीस पाटील युवराज माळी यांची मातोश्री व विवेकानंद दूध उत्पादक सहकारी सोसायटीचे संचालक,कुसुमबाई माळी यांची अल्पशा आजाराने लाक डॉन काळात निधन झाल्याने दशक्रिया गंध मुक्ती दिवशीला गाव पंगत , न देता,शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला व आपल्या आईच्या स्मरणार्थ पोलीस पाटील या जबाबदारी ने भडणे येथील आरोग्य उपकेंद्राला माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोही मला तपासणी कामासाठी आरोग्य सेविका आशा वर्कर यांना,गावात गती मिळावी म्हणून थर्मल मशीन ऑक्सी मीटर मास्क, सैनी टायझर, , तापमापक, इत्यादी वस्तू भडणे पोलीस पाटील यांनी स्वखर्चाने घेऊन,शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दुर्गेश तिवारी यांच्या हस्ते आरोग्य सेविका कविता बोरसे यांना देण्यात आले,पोलीस पाटील युवराज माळी , यांनी,यापूर्वीही कोरोणा काळात गावात आपला वाढदिवस न साजरा करता गरजूंना दोन क्विंटल तांदूळ वाटप केला होता, तसेच नैसर्गिक अल्बम थर्टी, गोळ्या देखील मोफत वाटप केले होते, नेहमी ते समाजकार्यात अग्रेसर राहतात,यामुळेच त्यांना मागील वर्षी धुळे जिल्ह्याच्या आदर्श पोलीस पाटील पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते मिळाला होता,पुष्पाताई पाटील उषाबाई शिंदे भाऊसाहेब ठाकूर छोटू लोहार मनोहर पाटील तालखेड येथील पोलीस पाटील महेंद्र पाटील आप्पा संतोष कोळीआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे गावकऱ्यांनी कौतुक केले
Tags
news
