जि.प. सदस्य यांचे निवेदन, निर्भीड विचार यांचा वृत्त प्रसारण ची दाखल, वाघाडी शिरपूर रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू




शिरपूर प्रतिनिधी  - शिरपूर तालुक्यातील शिरपूर शहर ते शहादा कडे जाणाऱ्या रोडवर शिरपूर वाघाडी या अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून  रस्ता दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ.अभिलाशा भरत पाटील यांनी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर यांना पत्रान्वये तक्रार सादर केली  होती. यात असे नमूद करण्यात आले होते की वाघाडी ते शिरपूर या रस्त्यावर  कर्मवीर अण्णा साहेब पेट्रोल पंपाजवळ अत्यंत दुर्दशा होऊन फार मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत असतात .याबाबत वारंवार आपणास दूरध्वनीवरून सूचित करण्यात आले होते मात्र संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे दुरुस्ती करून घेतलेली नाही. यापुढे या रस्त्यावर दुर्घटना झाल्यास त्याला सर्वस्वी पण ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी जबाबदार राहतील. याबाबत निवेदन देण्यात आले होते. या बाबत शिरपूर तालुक्याचा बुलंद आवाज निर्भीड विचार न दखल घेऊन बातमी प्रसारित केली होती त्यामुळे या निवेदनाची व बातमीची दखल घेत या रस्त्यावर काम सुरू कटण्यात आले आहे.त्या मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने