शिरपूर : येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न झाला.
आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय व व्ही. एल. एन. कमर्शिअल कार्पोरेशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा दि. २७/१०/२०२० रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत संपन्न झाला. या मध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग होता. या साठी पदविका, पदवी, पदव्युत्तर फार्मसी विज्ञान व अभियांत्रिकी या शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले.
रोजगार मेळाव्यासाठी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि यात एकूण ५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. ते पुढील प्रक्रियेसाठी पात्र झाले आहेत असे महाविद्यालयाचे हेड ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. हितेंद्र महाजन यांनी सांगितले. या निवड प्रक्रियेसाठी व्ही. एल. एन. कमर्शिअल कार्पोरेशन औरंगाबाद यांच्या तर्फे मॅनेजर नितीन पाटील व जनरल मॅनेजर शेंद्रे यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले.
रोजगार मेळावा संपन्न होण्यासाठी डॉ. हितेंद्र महाजन यांच्या टीमचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर शीतल महाले, डॉ. कपिल अग्रवाल, डॉ. मोनिका ओला, प्रा. विलास जगताप, डॉ. सौरभ गणोरकर, डॉ. विनोद उगले, डॉ. पंकज जैन, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार जितेश जाधव, प्राध्यापक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर आदींनी या रोजगार मेळाव्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Tags
news
