ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन




नंदुरबार :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार  यांच्या संयुक्त विद्यमाने  28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी व उद्योजकांसाठी ऑनलाईन पद्धतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील आस्थापना/कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्त पदांद्वारे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी  सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्यांयाकडून www.rojage.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची रिक्तपदे उद्योजकांकडून अधिसूचित करण्यात येत आहेत.  यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे योग्य किंवा ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आणि उद्योजकांनी  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा प्लेस्टोअरमधून ‘महास्वयंम’ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन त्यावर नोंदणी करावी.   ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा उमेदवारांनी व उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता अनिसा तडवी यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने