◆◆ टायगर ग्रुपचे स्वयंसेवक देत आहेत विध्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण
शहादा (प्रतिनिधी) :- स्व. निलेश राजपूत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मंदाणे तर्फे नवानगर (ता. शहादा) येथील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या शालेय साहित्याचे वितरण माजी जि. प. सदस्य सुनील चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष कल्पेश राजपूत सर व संस्थेचे उपाध्यक्ष भावेश मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. चव्हाण यांनी संस्थेतर्फे होत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. व गावातीलच टायगर ग्रुपचे स्वयंसेवक सर्व विध्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देत आहेत त्यांचेही त्यांनी कौतुक केले. संस्थेमार्फत देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर नक्कीच मुले करतील असे प्रतिपादन त्यावेळी श्री. चव्हाण यांनी केले.
कोरोनाचे संकट वाढत असतांना शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत व आहेत तर रेंज नाही अशा प्रकारच्या समस्या आहेत. या मुलांना स्मार्ट फोन अभावी ऑनलाइन शिक्षणही दुरापास्त आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गावांमध्ये घराघरात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी टायगर ग्रुपचे स्वयंसेवकांनी नवानगर (ता.शहादा) येथील शाखातर्फे गावातील मुलांना एकत्रित करून सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्यात टायगर ग्रुपचे स्वयंसेवक शुभम वाणी, प्रेम खर्डे, नागेश जाधव, राहुल पटले, विश्वास पटले, सुधीष पटले, कौशल्य पटले, आदी स्वयंसेवक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. यावेळी माजी जि. प. सदस्य सुनील चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष कल्पेश राजपूत (राजपूत सर), संस्थेचे उपाध्यक्ष भावेश मोरे, संस्थेचे सचिव पंकज माळी, सुरेश ठाकरे, निलेश पाटील, अतुल जाधव, गोविंद बोसले, एकनाथ चव्हाण, दिलवर जाधव, हिरालाल जाधव, अक्षय शेलटे, पन्नालाल चव्हाण, गणेश चव्हाण, बबलू चव्हाण आदी उपस्थित होते.
Tags
news
