शिरपूर : मका खरेदी सुरू करण्यात यावी याबाबत आमदार काशीराम पावरा व भाजपा पदाधिकारी यांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन देऊन मागणी केली. यावेळी तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत सूचना आमदार काशीराम पावरा व भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आल्या.
मका पीक खरेदी करण्याबाबतचे धोरण मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे निवेदनात म्हटले असून कृषी खात्याच्या रेकॉर्ड प्रमाणे खरेदी पोर्टल नोंदणी काढणीपूर्वी १५ दिवस अगोदर नोंदणी होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे साठवणुकीचे साधन नसल्यामुळे आणि खाजगी व्यापारी कमी भावात माल खरेदी करून घेत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने उत्पादन खरेदी करण्याबाबत अध्यादेश काढलेला आहे. परंतु, अद्याप पावेतो पोर्टलवर नोंदणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. तरी तातडीने नाव नोंदणी करण्याचे आदेश देण्यात यावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे याबाबतचे निवेदन तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व भाजपा पदाधिकारी शेतकरी यांनी तहसीलदार यांना दिले.
यावेळी आमदार काशीराम पावरा, भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रकाश भोमा गुजर, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक भरत पाटील, भाजपा माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ऍड. बाबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अविनाश पाटील, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, भाजपा तालुका उपाध्यक्ष भास्करराव बोरसे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष पिंटू बंजारा, भाजपा तालुका चिटणीस सुनील चौधरी, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, हिंगोणी शाखाध्यक्ष जितेंद्र पाटील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
Tags
news
