कुमारी मुक्ता श्यामसुंदर सोनी हिचे नीट परीक्षेत नेत्रदीपक आणि उल्लेखनीय यश.



----------------------------------------
विशेष प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे
------------------------------------------
लातुर : दि.१८ -  *नीट* परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून त्यात राजर्षी शाहू महाविद्यालयाची कुमारी मुक्ता श्यामसुंदर सोनी या विद्यार्थिनीने नेत्रदीपक व उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
नीट परिक्षेत कुमारी मुक्ता सोनी या विद्यार्थिनीस फिजिक्स - १४५, केमिस्ट्री - १५७, बायोलॉजी - ३३० असे एकूण - ६३२ गुण प्राप्त झाले आहेत. कुमारी मुक्ता सोनी या विद्यार्थिनीस प्रा. नागनाथ रायफळे, प्रा. ऊषा कावळे, प्रा. डाँ. राजेंद्र शिरसाट, प्रा. मनिष मनोहर, प्रा. आशिष बिडवे, प्रा. गजपती वर्मा, प्रा. डाँ. राजेश्री रेड्डी या सर्व मान्यवर प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
कुमारी मुक्ता सोनी च्या नेत्रदिपक यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. या वेळी मुक्ता आमच्या प्रतिनिधी बरोबर बोलताना म्हणाली की माझ्यावर  सद्गुरु माऊलींची कृपा आणि मला मार्गदर्शन करणारे वरील प्राध्यापक, राजश्री शाहू महाविद्यालय व महाविद्यालयाचे प्राध्यपक, माझे आई बाबा आणि माझे बंधू डॉ. ओंकार सोनी यांना असल्याचे तिने सांगितले.  
कुमारी मुक्ताच्या या नेत्रदिपक यशाबद्दल शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, सचिव प्रा. अनिरुद्ध जाधव, प्राचार्य, समन्वयक, सी. ई. टी. सेल प्रमुख, यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने