नीट परीक्षेच्या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थीनी युती संचेती चा गुण गौरव सोहळा संपन्न



बभळाज : कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जात असतात सतत अभ्यास करून होळनांथे गावातील युती संजयकुमार संचेती ह्या विद्यार्थीनी ने अभ्यासाची चिकाटी धरुन वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविले नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ६१० गुण संपादन केल्याचे कौतुक धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी शहरातील अक्षय रिसोर्ट येथे सत्कार प्रसंगी प्रतिपादन केले युती संचेती चे शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावी डॉक्टर म्हणून पुढील वाटचालीस रंधे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या  त्याचप्रमाणे नियमित अभ्यास करून जी मुले पुढे गेलेली आहेत तशा विद्यार्थ्यांना अनुभव देखील चांगलाच मिळत असतो आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपले पुढील आयुष्य उज्ज्वल बनवा असे आवाहन रंधे यांनी केले याप्रसंगी बळसाणे येथील मामा परिवार व शिरपूर च्या चोरडिया परिवाराने सत्कार केला यावेळी सुरेशचंदजी कोचर , प्रेमचंद चोरडिया , गौतम ओसवाल , राजेंद्र ओसवाल , उपेंद्र चोरडिया , संजय संचेती , ललित कोचर , बळसाण्या चे पत्रकार गणेश कोचर , पंकज बाफणा , रोशन जैन , गणेश जैन , निरज संचेती , निर्मल संचेती , राहुल कोचर , रोनक कोचर , अनुज बाफणा  आदी सत्कार प्रसंगी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने