शिरपूर : स्व. तपनभाई पटेल यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले असून पाच शैक्षणिक दालनांचा दसऱ्याच्या दिवशी भूमिपूजन सोहळा माजी मंत्री तथा श्री विले पार्ले केळवणी मंडळ अध्यक्ष अमरिशभाई पटेल व संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
शैक्षणिक संकुलांच्या भूमिपूजन व कार्यारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दि. २५ ऑक्टोबर २०२० रविवार रोजी करण्यात येत आहे. सकाळी ८ वाजता एस. व्ही. के. एम., एन. एम. आय. एम. एस. टेक्सटाईल कॉलेज (टेक्सटाईल पार्क, डीसान डाइंगच्या मागे) चे भूमिपूजन प्रभाकरराव चव्हाण (सचिव, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल शिरपूर) यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी ९.३० वाजता एस.व्ही.के.एम., एन. एम. आय. एम. एस. ऍग्रीकल्चर कॉलेज (तरडी-बभळाज) चे भूमिपूजन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १०.४५ वाजता आर. सी. पटेल आश्रमशाळा गरताड ता. शिरपूरच्या इमारतीचे भूमिपूजन डॉ. तुषारभाऊ रंधे (अध्यक्ष - जिल्हा परिषद सदस्य, धुळे) यांच्या हस्ते, सकाळी ११.१५ वाजता एस. व्ही. के. एम. फार्मसी कॉलेज, सावळदे ता. शिरपूर च्या इमारतीचे भूमिपूजन डॉ. विक्रमसिंह बांदल (प्रांताधिकारी, शिरपूर) यांच्या हस्ते, सकाळी ११.२५ वाजता आर. सी. पटेल मराठी माध्यमिक विद्यालय, सावळदे ता. शिरपूर च्या इमारतीचे भूमिपूजन तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला श्री विले पार्ले केळवणी मंडळ उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, अनेक पदाधिकारी उपस्थित राहतील.
Tags
news
