एस. व्ही. के. एम. संस्थेच्या "शिरपूर ६०" चा हृतिक पवार याचा आय. आय. टी. मद्रास मध्ये प्रवेश, कौतुकाचा वर्षाव




शिरपूर : श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई या संस्थे मार्फत अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल व सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, स्व. तपनभाई पटेल यांनी सुरू केलेल्या “शिरपूर ६०” योजनेतील लाभार्थी विद्यार्थी हृतिक पवार याचा आय. आय. टी. मद्रास येथे प्रवेश निश्चित झाला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मुकेशभाई आर. पटेल मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी हृतिक रवींद्र पवार हा एस. टी. संवर्गात प्रीपेरेटरी रँक 186 प्राप्त करुन जेईई ऍडव्हान्स मध्ये यशस्वी झाला होता.

हृतिक रवींद्र पवार याला आय. आय. टी. मद्रास येथे बायोलॉजीकल इंजिनिअरिंग (बॅचलर अँड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ड्युअल डिग्री, कालावधी ५ वर्षे) साठी प्रवेश मिळाला असून ही फारच मोठी अभिमानास्पद बाब आहे. विशेष म्हणजे पहिल्याच राऊंड मध्ये त्याला प्रवेश मिळाला आहे. त्याला प्राचार्य दिनेशकुमार राणा, मनिष बेहेल, तनिमा शर्मा, गौरव, वरुण मिश्रा, असरा बेगम व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी कौतुक केले.


“शिरपूर ६०” योजनेसाठी श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई या संस्थे मार्फत अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल व सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, स्व. तपनभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी बांधव व इतर गुणवंत विद्यार्थी यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुकेशभाई आर. पटेल मिलीटरी ज्युनिअर कॉलेज तांडे ता. शिरपूर येथे राहण्याची, अभ्यासाची तसेच सर्व सोयीसुविधा अशी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने