थाळनेरला ग्रामविकास अधिकार्‍यांची बदलीची मागणी




      थाळनेर (वार्ताहर):-
शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी वेताळे यांची बदली करण्याची मागणी चक्क  ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे गटविकास  अधिकाऱ्यांकडे केली आहे.
     याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी जे.के. वेताळे हे मनमानी कारभार करीत आहेत. सदर ग्राम विकास अधिकारी त्यांना जेव्हा वाटते तेव्हा ग्रामपंचायतीला येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्र देत नाही म्हणून गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सदर ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये नेहमी वाद होत राहतात. सदर ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करत असून ग्रामस्थांमध्ये यांच्या कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजगी असून सदर ग्राम विकास अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी .अन्यथा येणारा आठ दिवसात आम्ही खालील सही करणार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे. सदर तक्रार होती गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे.तसेच या तक्रारीची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांनाही देण्यात आले आहेत. या तक्रारीच्या प्रतीवर ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाटील, रवींद्र तवर अनिल मराठे , सौ.संगीताबाई भरत मराठे, भटु शिरसाठ , सौ.रेखाबाई डोंगर कोळी , सौ.अलकाबाई मधुकर शिरसाठ , सौ.अनिताबाई शाहू सोनवणे ,मन्यार जुबैर समद, शाम भील आदींच्या सह्या आहेत .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने