शिरपूर - आज दिनांक 13/10/2020 रोजी वनावल गटातील सौ. अभिलाषा भरत पाटील जि .प .सदस्य यांच्या प्रयत्नांनी मौजे उपरपिंड व मौजे बाभूळदे येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता कॉंक्रीट व भूमिगत पी. व्ही. सी. पाईप गटार कामाचे जिल्हा परिषदेतून मंजूर केले त्या कामांचे भूमिपूजन करताना माजी उपसभापती जगतसींग आनंदसींग राजपूत, माजी प. स. सदस्य श्री. भरत भिलाजी पाटील, जातोडे प. स. गणाचे सदस्य श्री. निलेश विश्वासराव पाटील व वनावल गटाचे जि. प. सदस्या सौ. अभिलाषा भरत पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी कोव्हीड-19 बाबत आवश्यक दक्षता घेण्यात आली.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटक वस्ती सुधार योजनेतून वनावल गटातील जि. प. सदस्य सौ. अभिलाषा भरत पाटील यांच्या प्रयत्नाने वनावल गटातील बाळदे, वनावल, रुदावली, टेंभे, खामखेडा या गावांना सोलर हायमस्ट लाईट मंजूर करण्यात आले आहेत. सदर कामासाठी तालुक्याचे विकास पुरुष म. अमरीशभाईसाहेब पटेल, जि. प. अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे, सामाजिक कार्यकर्ते श्री. आशोकजी कलाल, समाज कल्याण सभापती सौ. मोगराताई जयवंत पाडवी यांचे सहकार्य लाभले.
सदर भुमिपुजना प्रसंगी उपरपिंड येथे माजी सरपंच सौ. मायाबाई नागराज पाटील,माजी प. स. सदस्य नाना बन्सी भिल, ग्रामस्थ श्री. आनंदसींग दौलत राजपूत, श्री. उखा नथ्थू पाटील, श्री. गजेन्द्र झुलाल पाटील, प्रल्हाद शंकर सोनवणे, ग्रामसेवक श्री. डी. बी. तिरमले तसेच मौजे बाभूळदे येथे माजी प. स. सदस्य किरण हरकलाल पाटील, दशरथ कचरु निकुंभे, देवीदास बारकू निकुंभे, सुरेश बाबुराव निकुंभे, गोरख दगा बैसाने, प्रकाश हिरामण निकुंभे, महेंद्र उत्तम पाटील ग्रामसेवक श्री. बी. एस. चव्हाण आदी उपस्थीत होते.
सदर कामा बाबत वनावल गटातील सर्व गावांचे सरपंचानी जि. प. सदस्य सौ. अभिलाषा भरत पाटील व भरत पाटील यांचे आभार मानले.
Tags
news
