शिरपूर वि का सोसायटी चेअरमनपदी- दुर्गेश चौधरी व्हा चेअरमन पदी भुपेंद्र पाटील




शिरपूर(प्रतिनिधी) येथील शिरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तेली समाज महासभा युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष दुर्गेश जगन्नाथ चौधरी यांची व व्हा चेअरमनपदी भुपेंद्रसिंग सारदारसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शिरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी संस्थेच्या कार्यालयात सहाययक निबंधक कार्यालयाचे श्री दाऊळकर यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक प्रभाकरराव चव्हाण, मोहनदादा पाटील व सर्व संचालकांच्या संमतीने चेअरमनपदासाठी दुर्गेश जगन्नाथ चौधरी व व्हा चेअरमन पदासाठी भुपेंद्रसिंग सरदारसिंग पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आल्याने त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दाऊळकर यांनी घोषित केले. 
 सादर निवड प्रसंगी संचालक प्रभाकरराव चव्हाण, मोहन पाटील,काशिनाथ माळी, सोनू सोनार,भिका माळी, मोहन सोनवणे, गणपत धनगर,रुपेश जैन,चावदस चांभार, सौ सविता देशमुख, सौ यशोदा चौधरी, सचिव   ईशी, राजेंद्र चौधरी, आशिष चौधरी, महेश चौधरी,रमेश चौधरी,नरेश चौधरी,जितेंद्र सोनवणे, भगवान चौधरी,चेतन चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते. निवड होताच  त्यांचा सत्कार प्रभाकरराव चव्हाण, मोहन पाटील, शामकांत ईशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 सदर निवड माजी मंत्री अमरिषभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड झाली. निवड होताच चेअरमन दुर्गेश चौधरी यांनी माजी मंत्री श्री अमरिषभाई पटेल,आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांची त्यांच्या जनकव्हीला निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतलेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने