महेंद्रसिंग राजपूत - शिरपूर तालुक्यासाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून समोर आला असून पटेल परिवाराचा आधारस्तंभ व लाडका पुत्र आज अनंतात विलीन झाले आहेत. आज हजारो लोकांच्या उपस्थितीत सोशल अंतराचे पालन करून शिरपुरातील फार्मसी कॉलेज च्या प्रांगणात त्यांचे अंतिम संस्कार विधी साय काळी 7 वाजता पार पाडण्यात आले. या वेळी पटेल कुटुंबातील सर्व सदस्य मा.माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, उप नगराध्यक्ष मा.भुपेशभाई पटेल, नगराध्यक्ष मा.जयश्रीबेन पटेल, नातेवाईक,खा.हिनाताई गावित, माजी मंत्री विजयकुमार गावित ,राजवर्धन कदमबांडे,भगवान करणंकाळ,धुळे, अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर,सर्व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,सरपंच, कार्यकर्ते व पटेल परिवारावर प्रेम करणारे नागरिक या वेळी भाव विभोर होऊन उपस्थित होते.
आज शिरपूर येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एकला अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएमएस कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार (एमएच 18 एएक्स 8) ही रास्ता दुभाजकाला धडक बसल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात इंजिनचा स्फोट झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. आणी ते यातून वाचू शकले नाही व त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, दिसान व ऑटो रायडर ग्रुप चे डायरेक्टर आदी पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र, माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होते.या घटनेची माहिती कळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे .
त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जसोदाबेन एम.एल. स्कुल येथे 1994 मध्ये केले होते.
या नंतर ते पुढील उच्च शिक्षणासाठी 1998 ला
यु .के .ला व 2020 मध्ये लंडन ला शिक्षण घेतले होते. या नंतर व्यवसाय निमित्त ते मुंबई व शिरपूर येथे वास्तव्यास होते.त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1980 रोजी झाला होता. 7 फेब्रुवारी 2011 मध्ये श्रीमती रीमा पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मात्र आज काळाने घाला घातला व पटेल परिवाराचा सुपुत्र व शिरपूर तालुक्याच्या युवकांचा आधारवड हरपला आहे. आज शिरपूर तालुक्यातील युवक व परिवार पोरका झाला असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पटेल परिवाराच्या या सुपुत्रास निर्भीड विचार न्युज परिवारा कडून भाव पूर्ण श्रद्धांजली.
Tags
news
