*राजकुमार जैन बभळाज*
शिरपूर चोपडा राज्य महामार्ग वरील असली फाट्याजवळ शिरपूर कडुन चोपडा कडे भरधाव वेगाने जाणारी एमएच ४० बीएल ५४६९ क्रमांकाची आयशर असली फाट्याजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने समोरुण हीसाळे येथुन शिणगव्हाण ता.नंदुरबार येथे मीरचीचे रोप पोहोचवायला जाणारी एमएच १८ एए ६४८५ क्रमांकाची पिकअप गाडीला जोरदार धडक देऊन पंन्नास ते साठ फुट शेतात ओढुन नेल्याने यातील गाडी मालक प्रवीण शालीग्राम कोळंबे वय ४३ व चालक अशोक नारायण करंकाळ वय ४५ दोघे राहणार हीसाळे ता.शिरपूर हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहीती कळताच जवळच असणाऱ्या असली गावातील गावकऱ्यांनी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले तात्काळ पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे पाठविण्यात आले तीथे प्रविण कोळंबे या तरुणास डॉक्टरांनी मृत झाल्याचज घोषित केले.धडक ईतकी जोरदार होती की अपघातात पिकअप वाहन अक्षरशः चकनाचुर झाले असुन आयशरचे चालक व सह चालक फरार झाले आहेत.अपघाताची थाळनेर पोलीस स्टेशनला कळताच सपोनि सचिन साळुंखे आपल्या करमचा-यांसह घटनास्थळी पोहोचले.हीसाळे गावात अपघाताची माहिती कळताच शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त होत आहे. रामेश्वर पाटील, कांतीलाल पाटील,विकास पाटील, मंगेश पाटील सह गावकऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.प्रवीण कोळंबे भेंडीचे व्यापारी असुन रोज वाशी,इंदोर अशा विविध ठीकाणी भाजीपाला विक्रीसाठी पाठवीत असतात.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ वहीनी असा परीवार आहे.
Tags
news
