शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील पंचायत समिती चा भोंगळ कारभार विविध कारणांनी सतत प्रकाशझोतात असतो मात्र यावेळी सदरचा प्रकार खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊसो तुषार रंधे यांच्या उपस्थितीत समोर आल्यामुळे पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते 10 च्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी शिरपूर पंचायत समिती कार्यालयाला अचानक भेट दिली यावेळी त्यांना कार्यालयात शुकशुकाट आढळून आला. व केवळ सात कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळेस त्यांचे असे निदर्शनास आले कार्यालयातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित नाही .तालुक्यातील जनता आपल्या विविध कामांसाठी पंचायत समिती या कार्याला सोमवारी आणि गुरुवारी भेट देत असते आणि बहुसंख्य अधिकारी या दिवशी उपस्थित देखील असतात मात्र या दिवशी गुरुवार असून देखील अनेक अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र समोर आले. यावेळी खुद्द गटविकास अधिकारी देखील कार्यालयात उपस्थित नसल्याचे अध्यक्ष यांना निदर्शनास आले. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही या दिवशी कार्यालयात झालेल्या या प्रकाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते माधव फुलचंद दोरिक यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये या दिवशी कार्यालयात वेळेत हजर नसलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती मागवली होती . त्यानुसार देण्यात आलेल्या माहितीमध्ये दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयीन वेळेत तब्बल 52 अधिकारी आणि कर्मचारी हे हजर नव्हते अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजे या दिवशी पंचायत समिती कार्यालयात तब्बल 52 अधिकारी आणि कर्मचारी लेट लतीफ होते असे निदर्शनात आले आहे .याबाबत वारंवार तक्रार करून देखील पंचायत समितीच्या कारभारात कोणतीही सुधारणा होत नसल्याने पंचायत समितीच्या भोंगळ कारभार आजतागायत जसाचा तसाच सुरू आहे .कार्यालयातील 70% कर्मचारी ,हे बाहेर गावाहून येऊन नोकरी करत असतात कायद्याने त्यांना मुख्यालयी राहण्याचे बंधनकारक असताना देखील वारंवार नियमबाह्य काम करून आम्ही मुख्यालय राहतो यासाठी खोटे कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल केली जाते आणि जनतेला वेठीस धरले जाते .याबाबत कर्मचारी खोटी कागदपत्रे सादर करून मुख्यालयी राहत आहोत असेल दर्शवून शासनाची करोडो रुपयांची लल लूट करत आहेत. मुख्यालयी राहत नसताना देखील कर्मचारी आपल्या पगारात घरभाडे भत्ता याचा लाभ घेतात याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी वारंवार तक्रारी आणि पुरावे करून देखील जिल्हा परिषद प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करत नाही आणि निव्वळ बाहेरगावाहून कर्मचारी कामावर येतात म्हणून ते नेहमीच लेट लतिफ राहतात कार्यालयीन वेळ जरी सकाळी साडेनऊ ते दहा ची असली तरी बहुसंख्य अधिकारी हे दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान कार्यालयात हजेरी लावतात हे नित्याचे होऊन बसले आहे मात्र वरिष्ठ अधिकारी स्वतः नियमांचे पालन करत नसल्यामुळे त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही आणि त्यामुळे हा भोंगळ कारभार असाच सुरू आहे किमान आता हा सर्व प्रकार जिल्हा परिषद अध्यक्षांच्या लक्षात आल्यानंतर ते तरी काही कारवाई प्रस्तावित करतात का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे
Tags
news
