गॅस सिलेंडरचा काळा बाजार, तालुका पोलिस स्टेशनच्या कारवाई, 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

 




धुळे प्रतिनिधी -धुळे जिल्ह्यातील तालुका पोलीस स्टेशनच्या कारवाई अवैध गॅस सिलेंडरच्या काळाबाजार करून गॅस चोरी  करणाऱ्यांवर कारवाई करण्यात धुळे तालुका पोलीस स्टेशन ला आले आहे यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की धुळे तालुका पोलीस स्टेशन सहा पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने एक प्रथक तयार करून कारवाई केली असता हॉटेल कलकत्ता च्या पाठीमागे  गॅस टँकर क्रमांक एम एच 04 जे.के 21 29 जवळ उभे राहून काही जण गॅस टँकर च्या व्हॉल्व ला पाइप जोडून त्यातील  गॅस हा घरगुती सिलेंडर ला जोडून काळा बाजार करत होते .त्यांच्यावर  छापा टाकून  9 ऑक्टोबर रोजी रात्री 3.50  वा.  आरोपी (1 ) भरत हरिदास चौधरी, वय 45 राहणार शिवाजीनगर प्लॉट नंबर 95  वाडीभोकर रोड  देवपुर धुळे (2) पारस जयंतीलाल जैन राहणार योगेश्‍वर कॉलनी दहिवेल पारोळा जिल्हा जळगाव, (3)  नरेंद्र देविदास हिवराळे वय 32 राहणार नवानगर बाळापुर यांना ताब्यात घेतले आहे . जागेवरून पळून गेलेल्या वाहन चालकाचे नाव राहुल गजानन दाभाडे राहणार टेंभुर्णा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असल्याची माहिती मिळाली आहे . सदर ठिकाणी हा गॅस टँकर उभा करून डाव्या बाजूस असलेल्या एका पत्र टी बॉक्स उघडा कर त्यात लावलेल्या वॉल मधून सील तोडून त्याच्या तोंडात लोखंडी पाइप मधून सुमारे दोन फूट लांबीच्या पाईप गॅस सिलेंडर भरण्यासाठी वापर करताना आढळून आला.  या कारवाईत 25 लाख रुपये किमतीच्या इंडियन गॅस टँकर त्यात असलेला गॅस 5, रुपये पाच लाख 28 हजार 692 असा एकूण 30 लाख 28 हजार 692 रुपये किमतीच्या मुद्देमाल 5 हजार रुपये किमतीचा वाल्व पाईप, 47 हजार 500 रुपये किमतीचे इंडियन गॅस लिहिलेले सिलेंडर, 14 हजार 500 रुपये किमतीचे लाल रंगाचे गॅस सिलेंडर, 17 हजार रुपये किमतीचे इंडियन गॅस लिहिलेले सिलेंडर 900 रुपये किमतीच्या लोखंडी आकाराच्या पोपट असा एकूण 31 लाख 13 हजार 592 रुपये किमतीचा मुद्देमाल सदरच्या कारवाईत पोलिसांनी जप्त केला आहे .वरील चारही आरोपींवर धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 285 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 37 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी नंबर 1 ते 3 यांना अटक करण्यात आली असून नंबर 4 आरोपी चालक फरार आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव ,  उप विभागीय पोलीस अधिकारी  प्रदीप मैराळे,यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मोरे ,प्रवीण पाटील ,किशोर खैरनार, चेतन चव्हाण ,अन्वर पठाण ,सांगळे ,राकेश महाले ,देसले ,भावसार इत्यादींच्या पथकाने केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने