दोंडाईचा - हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु कॉलेज , दोंडाईचा येथे हिंदी दिवस - सप्ताह समापन समारोह दि. १३ सेप्टेंबर२०२० रविवार रोजी मायक्रोसॉफ्ट टीम व्हर्चुअल क्लासवर साजरा करण्यात आला. हिंदी दिवसाचे औचित्य साधून वाद - विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेकार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता, विद्यादायीनी मा शारदेचे व महान हिंदी साहित्यकाराचे तसेच कै. दादाजी श्री हस्तीमल जी जैन, कै. पप्पाजी शांतिलाल जी जैन , कै.काकाजी कांतिलाल जी जैन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. ईश्वर पी ठाकुर ( धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर) हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून तर दोंडाईचा तील सामाजिक कार्यकर्ता व मुक्त पत्रकार श्री राजेश जी के ईशी विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील हिंदी विभाग प्रमुख श्री विजेंद्र भोई सर यानी केले तर सूत्र संचालन हिंदी शिक्षक मनोजकुमार ठाकूर सरांनी केले. या नंतर कु.देवयानी भलकार हिने हिंदी गौरव गीत गायन केले तर कु.प्राची देवरे व आरुषि देवरे( ई - ७ वी) यांनी भाषने केलीत .
ऑनलाईन शिक्षा प्रणाली उचित है या अनुचित? या विषयावर विद्यालयातील ई-६ वी ते १० वी तील एकूण बारा विद्यार्थ्यांनी वाद - विवाद स्पर्धेत भाग घेतला होता .
१) रुषिकेष पवार (ई -६ वी)
२) नकिया बोहोरी (ई -६वी)
३)वेद पाटील (ई -८ वी )
४)प्र ज्ञेश शिंदे (ई -७वी)
५)जान्हवी पवार(ई -८ वी)
६)दिव्या लखोटीया (ई-८वी)
७)सूर्यभान गिरासे (ई-९वी )
८)योगिराज चित्ते (ई -९ वी)
९)उदयराज बागल(ई-१०वी)
१०)भूमिका निगम(ई-१०वी)
११)तितिक्षा कोठारी (ई-१०वी)
१२)रागिनी गांगुर्डे (ई-१०वी)
या सर्व वाद - विवाद पटून्नी
ऑनलाईन शिक्षण पद्धतिच्या पक्षात सकारात्मक बाजू मांडली तर काहिंनी त्यांच्या मुद्यांचे खंडन करून ऑनलाईन शिक्ष्णातिल समास्या मांडल्या. विशेषत: या वाद - विवादाचे परीक्षण प्रा.डॉ.ईश्वर ठाकुर व शाळेचे पालक श्री राजेश ईशि व
शाळेतील वरिष्ठ शिक्षक श्री. भूषण दिक्षीत सर यांनी पारदर्शकपणे परीक्षण करून गुणदान केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. ठाकुर व श्री ईशी सर यांनी विद्यार्थ्यांनसाठी मार्गदर्शन पर भाषणे केलीत .व अध्यक्षीय भाषण शालेय सल्लागार समिती चे अध्यक्ष डॉ. श्री विजयजी नामजोशी सर यांनी केले . श्री महेंद्र गिरासे सर यांनी आभार प्रदर्शन केले .
या स्पर्धेसाठी
१) श्री अरविंद देवरे सर व श्री विलास पाटील सर यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.
२)श्री. प्रवीण वाडीले सर *बॅनर मेकिंग व निमंत्रण पत्रिका बनविनेस सहकार्य लाभले*
कार्यक्रम यशस्वी होन्या करिता हिंदी विभागातिल सर्व शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले.
हस्ती स्कूल येथे दरवर्षी नियमितपणे दिन विशेषातंर्गत अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याद्वारा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात व त्यांच्यावर देशभक्ती आणि ऐतिहासिक जाणीवांचे संस्कार रूजविले जातात. सोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासासही चालना मिळते.
*स्पर्धेत विजयी झालेल्या* *विद्यार्थ्यांची नावे*
*प्रथम क्रमांक*
१)दिव्या राजेश लखोटिया
(ई -८वी)
*द्वितीय क्रमांक*
२)जान्हवी विनोद पवार
(ई -८ वी)
*तृतीय क्रमांक*
३) प्र ज्ञेश शितलकुमार शिंदे (ई-७ वी)
*उत्तेजनार्थ बक्षीस*
१)भूमिका निगम (ई -१०वी)
२) रागिनी गाँगुर्डे ( ई-१०वी)
सर्व विजेता व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु कॉलेज यांच्या कडून करण्यात आले आहे.
Tags
news
