माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्ताने भुपेशभाई ग्रीन आर्मी तर्फे महावृक्षारोपण दिवस साजरा, अनेक ठिकाणी वृक्षारोपण

 

शिरपूर - माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्ताने भुपेशभाई ग्रीन आर्मी तर्फे महावृक्षारोपण दिवस साजरा करण्यात येऊन अनेक ठिकाणी नगरसेवक तापनभाई पटेल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शहरातील आत्माराम नगर येेेथे नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, बाजार समिती सदस्य अविनाश पाटील, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, प्रियदर्शिनी ऑफसेट संचालक प्रकाश गुरव, माजी पंचायत समिती सदस्य छगन गुजर, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, युवक तेली समाज प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी, नगरसेवक भुरा राजपूत, राजू एजंट, रज्जाक कुरेशी, जाकीर शेख, जाकीर मिस्त्री, अतुल पाटील, सुरेश अहिरे, सिद्दीक तेली, विनोद पाटील, राजेंद्र चौधरी, विनायक कोळी, लाला गिरासे, सागर कुलकर्णी, वसंत माळी, महेश पाठक, संदीप कुवर, किशोर चव्हाण, दुर्गेश चौधरी, भगवान चौधरी, जितेंद्र सोनवणे, नवलसिंग परदेशी, खुशाल पाटील, अनेक पदाधिकारी, भूपेशभाई ग्रीन आर्मी चे सदस्य उपस्थित होते.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल व प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने तसेच शिरपूर तालुक्यात लाखो वृक्ष लावून ते जगवून हरित क्रांती यशस्वीपणे राबविण्याची मोठी मोहीम "भुपेशभाई ग्रीन आर्मी" च्या वतीने सुरु आहे. शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात लिंब, बांबू, अंजन, चिंच, बेल, आवळा, करंज, सिताफळ, केठ, उंबर अशी पर्यावरण पूरक अनेक वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ११ हजार वृक्ष लागवडीचे संकल्प पूर्णत्वाकडे आले आहे. 

बबनराव चौधरी म्हणाले, माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी नगर परिषदेच्या
माध्यमातून हजारो वृक्ष लागवड केली असून, सर्वच क्षेत्रात विकासाचे काम भाईंचे असल्याने त्यांना जनमानसात मोठे स्थान आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने