धुळे, दि. 20 : आज दि 20/9/2020 रोजी गिरणा नदीपात्रातून एक लक्ष क्युसेक्स वेगाने पाणी तापी नदी पात्रांमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे ,तसेच हतनूर धरणांमधून 16 हजार क्युसेक्स पाणी प्रवाह सुरू असून ईतर नदी व नाले यांचा एकूण विसर्ग 125000 क्युसेक पर्यंत तापी नदी मधून सुलवाडे धरणाव्दारे खालील बाजूस येण्याची शक्यता आहे , सध्यस्थीतीत पाणी पातळी नियंत्रीत करणे कामी ,आज दुपारी 12.00 पासून सुलवाडे बॅरेज मधून 35751 क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे . तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून त्याची गती वाढल्यास सदर प्रवाहामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही , सबब पुढील काही दिवस , सुरक्षेच्या व पुरपरिस्थीती इ.कारणास्तव आपले स्तरावरुन, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील तापी काठच्या गावांना सावधानतेचा व सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
Tags
news
