शिरपूर (प्रतिनिधी )वाघ्या मुरळी लोकलावंतांना आर्थिक सहाय्य व विविध मागण्या मंजूर करण्यात यावेत यासाठी तहसीलदार आबा महाजन व आमदार काशिराम पावरा यांना वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले
समाजातील भाविकांच्या आश्रयावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वाघ्या मुरळी लोककलावंतांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनमुळे जागरण गोंधळ कार्यक्रम होऊ न शकल्याने उपासमारीची वेळ आली असून या कलावंतांना अर्थ साहाय्य व त्यांच्या न्याय मागण्या शासन दरबारी मंजूर करण्यातयासाठी वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने तहसीलदार आबा महाजन व आमदार काशिराम पावरा यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे वाघ्या मुरळी लोककलावंत कलेच्या माध्यमातून धर्म,जागरण, कूळ धर्म,कुळाचार पालन,समाज प्रबोधन समाजसेवेचे कार्य करीत आहेत मागील वर्षी अतिवृष्टी व त्यांनतर निवडणूक आचारसंहिता यामुळे कलावंतांना पुरेषे उत्पन्न मिळू शकले नाही त्यात यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जागरण गोंधळ कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने वाघ्या मुरळी या लोकावंतांचे कुटुंबिय आर्थिक संकटात सापडल्याने उपासमारीची वेळ आल्या मुळे शासनाने वाघ्या मुरळी लोककलावंतांना अर्थसहाय्य देऊन जगण्यासाठी आधार देण्याची विनंती निवेदनात केली आहे.
यावेळी वाघ्या मुरळी महाराष्ट्र परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र गुरव दहिवदकर, रमेश गंगाराम शिरसाट , मकर राघो शिरसाट , देविदास विठ्ठल ठोंबरे, नरेंद्र बापू शिरसाट, प्रताप अर्जून खडाळे, राजू ओंकार मगरे,ईश्वर गंगाराम शिरसाट ,कैलास रामदास शिरसाट, भगवान रघुनाथ सोनवणे व कलाकार यावेळी उपस्थित होते.
Tags
news
