यवत - राहुलकुमार अवचट
"रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान "
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा असल्याने अनेकांना रक्तासाठी काही समस्या निर्माण होत आहे
अशा परिस्थितीत सामाजिक उपक्रम राबविणारी यवत परिसरातील हरितवारी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना , यवत शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महालक्ष्मी माता मंदिर ,यवत येथे रविवार , दि .२० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०९ ते ०५ यावेळेत " भव्य रक्तदान शिबीर " चे आयोजन करण्यात आले आहे
रक्तदान हे महादान आहे, सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे
यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे, रक्तदात्यांनी तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझर वापरणे, विनाकारण गर्दी न करणे, सोशल डिस्टंन्सचे पालन करणे बंधनकारक राहील
अधिक माहितीसाठी ९९२१२२८१८२, ९८२३९२२७७९ या क्रमांकवर साधावा.
Tags
news
