शहादा प्रतिनिधी अश्विन सोनवणे
नंदुरबार जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश दिलवरसिंग पाडवी यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक उईकेयांनी नागेश पाडवी यांची नियुक्ती केली असून त्यांना पत्रही प्राप्त झाले आहे खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, जिल्हा सरचिटणीस राजू गावीत, नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी पाडवी यांच्या निवडीचे स्वागत केले.
Tags
news
