धुळे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय मान्यताप्राप्त रुग्णांलयांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत आणि सुरळीत राहील,
अशी दक्षता घ्यावी,
असे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पुरवठादारांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री.
यादव यांनी म्हटले आहे, सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोविड-
19 बाधित रुग्णांची वाढ विचारात घेता सर्व शासकीय व खासगी इस्पितळात ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व शासकीय, खासगी वैद्यकीय मान्यताप्राप्त दवाखान्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मान्यताप्राप्त दवाखाने,
शासकीय दवाखान्यांना प्राधान्याने त्यांच्या मागणी प्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करावे.
कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेस केला जाणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी.
अनधिकृत व्यक्तीस ऑक्सिजनचा पुरवठा केल्यास व त्यामुळे काही अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुरवठादारांची राहील.
तसेच एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयाकडून अचानक ऑक्सिजनची मागणी वाढल्यास त्याबाबतची पूर्व कल्पना जिल्हाधिकारी किंवा संबंधित नोडल अधिकाऱ्यांना तातडीने देणे बंधनकारक राहील. राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना,
निर्देशाद्वारे केवळ नोंदणीकृत रुग्णालयांच्या मागणीप्रमाणे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्याबाबत कोणतेही उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घ्यावी,
असेही जिल्हाधिकारी श्री.
यादव यांनी गोविंदा गॅसेस प्रा.
लि. व दि लाइफ लाइन,
धुळे या पुरवठादारांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
