शिरपूर तालुक्यातील शिंगावे शिवारात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी




शिरपूर प्रतिनिधी-  काल दिनांक 20 रोजी शिरपूर तालुक्यात सायंकाळी अवकाळी पाऊस होऊन वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली त्यामुळे तालुक्यातील शिंगावे परिसरातील शेतकऱ्यांचे केळी, पपई ,मका, कापूस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत याआधीच कोरोना मुळे व सततच्या लॉकडॉऊन मुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आर्थिक हालकी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकांसाठी खाजगी सावकार बँक व इतर वित्तीय संस्थांकडून कर्जे उभारून पिकांची पेरणी केली होती मात्र पिकांची वाढ जोमदार असताना दिनांक 20 सप्टेंबर रोजी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने शेतातील सर्व पिके जमीनदोस्त झाली आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलेला आहे याबाबत आज शिंगावे परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी शिरपूर चे तहसीलदार यांना निवेदन सादर करून प्रत्यक्ष घटनास्थळाचे निरीक्षण करून नुकसानीचा पंचनामा करावा व शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती निवेदनातून केली आहे शिवाय याबाबत शासनाने सहकार्य न केल्यास अथवा या निवेदनाची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे देखील भावना व्यक्त केले आहे या निवेदनावर परिसरातील लोटन पाटील, जयवंत पाटील ,चंद्रकांत पाटील, संजय पाटील, मुरलीधर पाटील ,मधुकर पाटील निंबा पाटील ,गणेश पाटील ,देवीदास पाटील, लोटन पाटील ,दिलीप पाटील, सतीश पाटील ,सखाराम पाटील, गोपीचंद पाटील, युवराज पाटील ,प्रमोद पाटील ,नवल पाटील, दगडू पाटील ,धनराज पाटील, संतोष पाटील ,उत्तम पाटील ,यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने