अजबसिंग गिरासे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित

 



शहादा (प्रतिनिधी) : शहादा येथील नावलौकिक असलेले सन्मित्र क्रीडामंडळा तर्फे दरवर्षी जनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी देखील शहादा तालुक्यातील आठरा कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील माध्यमिक विद्यालय आमोदा येथील कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक ,विद्यार्थी प्रिय शिक्षक, सर्वगुणसंपन्न एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व अजबसिंग गिरासे यांना जनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच दरवर्षाप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सद्गुरू विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष आण्णा पाटील, सचिव ताईसाहेब पाटील संचालक सचिन पाटील व सर्व संचालक मंडळ सह शिक्षकवृंद व शिक्षकेतर वर्ग यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अजबसिंग गिरासे यांचे अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने