ड्रायव्हर भाऊ मदत संघ, महाराष्ट्र राज्य संस्थेचा पदाधिकारी नियुक्ती सोहळा




  ड्रायव्हर भाऊ मदत संघ,  महाराष्ट्र राज्य संस्थेचा पदाधिकारी नियुक्ती सोहळा दौंड तालुक्यात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात जाणताराजे छञपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आली
 असंघटीत असलेल्या ड्रायव्हर बांधवांवर होणाऱ्या  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच ड्रायव्हर यांना वाहन चालविताना  येणाऱ्या  विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व ड्रायव्हर बांधवाना  एकत्र करण्याच्या ऊद्देशाने ड्रायव्हर भाऊ मदत संघ महाराष्ट्र राज्य संस्था स्थापन करण्यात आल्याची माहीती संस्थेचे संस्थापक आध्यक्ष हनुमंत माने यांनी दिली.
ज्या प्रमाणे रिक्षा संघटना, टेम्पो संघटना अशा अस्तित्वात आहेत त्याच प्रमाणे सर्व ड्रायव्हर एकत्र करुन महामार्गावरुन जात असताना विविध अडचणी येतात अशा अडचणी सोडविण्यासाठी सोशल मिडीया मार्फत त्यांना तात्काळ मदत केले जाईल यावेळी अनेकांनी आपल्या समस्या उपस्थित केल्या यावर संघटना पुढील काळात कार्य करेल
 यावेळी ड्रायव्हर बांधवाना मेडिक्लेम पाॅलीसी, इंश्युरंन्स, या सारख्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पञ देण्यात आले
 या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत माने, उपाध्यक्ष दिपक लावरे, सचिव विजय माने, सहसचिव संदिप राठोड, कोषाध्यक्ष समाधान शिरसाठ, सहकोषाध्यक्ष विठ्ठल झिंजरुटे, संचालिका राणीताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे दौंड तालुका उपाध्यक्ष आनिल गायकवाड यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने