आर. सी. पटेल पॉलीटेक्नीकमध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न




शिरपूर - येथील आर.सी.पटेल पॉलीटेक्नीकमध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न झाला.
 स्थापत्य अभियांत्रीकी विभाग व अल्ट्राटेक सीमेंट प्रायव्हेट लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ई- पोस्टर प्रेझेंटेशन, थींक प्लॅन आणि ड्रॅा अशा स्पर्धा अनुक्रमे द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आयोजित करण्यात आल्या.
सुरवातीस प्राचार्य नवीन हासवानी यांच्या हस्ते माता सरस्वती व डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. त्यांनी स्पर्धेचे ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी प्रा. अश्विनी चौधरी यांनी या कार्यक्रमाबाबत संपुर्ण माहीती देवून विद्यार्थ्यांना स्पर्धेचे नियम समजून सांगितले. 
सदर कार्यक्रमाचे कन्व्हेनर म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य नवीन जी. हासवाणी व इंजिनिअर हेमंत जैन (आर.एच.टी.) पुणे यांनी तर व्यवस्थापक म्हणुन स्थापत्य अभियांत्रीकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अमोल पाटील व प्रा. मनीष कासार यांनी योगदान दिले. 
ऑनलाईन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ई-पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत चिन्मय पवार, कोमल चौधरी, अनुष्का शिरसाठ तर थींक प्लॅन आणि ड्रॅा या स्पर्धेत लक्ष्मी पाटील, यश बागुल, तनुजा राजपूत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना लगेच ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. 
वरील कर्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्या विभागातील प्राध्यापकांनी योगदान दिले.
यशस्वी विद्यार्थी यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, प्राचार्य नवीन जी. हासवाणी यांनी केले. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने