शिरपूर - तालुक्यातील हिसाळे गावाजवळील नाल्यावर शिरपूर पॅटर्नअंतर्गत २४४, २४५ व २४६ व्या बंधाऱ्यांचे म्हणजेच एकूण ३ बंधाऱ्यांचे भूमिपूजन शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभाग अंतर्गत शिरपूर पॅटर्न पुनर्भरण बंधारा भूमिपूजन शनिवारी दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता हिसाळे व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर पॅटर्नचे काम सातत्याने व नियमितपणे सुरू ठेवले आहे. शिरपूर तालुक्यात आतापर्यंत २४० शिरपूर पॅटर्न बंधारे चे काम पूर्ण झाले आहेत. शिरपूर तालुक्यातील बऱ्याचशा भागात जमिनीत भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चितच वाढली आहे. अनेक ठिकाणी मुबलक जलसाठा निर्माण झाला असून तालुक्यातील उर्वरित भागात देखील टप्प्याटप्प्याने शिरपूर पॅटर्न अंतर्गत बंधारे बांधले जात आहेत.
यावेळी आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा परिषद सदस्या बेबीबाई पावरा, कुटवाल पावरा,
शिरपूर शेतकरी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, माजी पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, संतोष परदेशी हिसाळे, उपसरपंच गोविंद भिल, गोविंद परदेशी, प्रदीप बाविस्कर, अरविंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, जितेंद्र करंकाळ, दादा गायकवाड, दिलीप पाटील, तोंदे सरपंच संतोष अहिरे, अनिल गुजर तोंदे, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, लघुसिंचन विभागाचे उपविभागीय जलसिंचन अधिकारी हितेश भाटूरकर, शिरपूर पॅटर्नचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ व्यक्ती शिवाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष देविदास श्रीराव, राजेंद्र कोळी, संतोष जाधव, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, संतोष माळी, विनायक कोळी, पंचक्रोशीतील पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
Tags
news
