पत्रकारांच्या ओंदोलनास राज्यभर अभूतपूर्व यश,महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सर्व तमाम पत्रकारांचे आभार..




 पत्रकारांच्या राज्यव्यापी आंदोलनास आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना राज्यभरातून हजारो एसएमएस पाठविले गेले आणि जोरदार पाऊस असताना देखील राज्यातील जवळपास शेकडो तालुक्यातून व तीस जिल्यातून हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल राज्यातील तमाम पत्रकारांचे आभार .
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केल्याप्रमाणे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना सुरू करावी, कोरोनानं आजारी पत्रकारांना  बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची तात्काळ व्यवस्था व्हावी आणि पत्रकार संतोष पवार आणि पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस जबाबदारांवर कारवाई व्हावी,यासंदर्भात आज राज्यभर आंदोलन केले.. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना जिल्हा जिल्हयातून हजारो एसएमएस पाठवून पत्रकारांनी आपल्या तीव़ भावना व्यक्त केल्या.. "आम्ही कोरोना यौध्दे आहोत ना? मग आमची काळजी घ्या, दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख आणि पत्रकार विमा योजना तात्काळ सुरू करा" अशी विनंती एसएमएस पाठवून करण्यात आली.. 
 सर्वत्र पाऊस कोसळत असताना देखील पत्रकारांनी तोंडाला काळे मास्क लावून निषेध व्यक्त केला.असंख्य पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून आपल्या भावना कळविल्या..
वरील सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील पत्रकारांच्या भावना किती तीव्र आहेत याची जाणीव सरकारला झाली असेल आणि त्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांची लगेच पुर्तता होईल अशी अपेक्षा  आहे..
अत्यंत अल्प काळात आवाहन केल्यानंतरही राज्यातील पत्रकारांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीच्यावतीने राज्यातील तमाम पत्रकारांचे आभार मानले आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने