शहादा प्रतिनिधी अश्विन सोनवणे*
तोरखेडा ता.शहादा जि.नंदुरबार येथील तापी काठावरील ४००वर्षे पुरातन महादेव मंदिर परिसरात छावा संघटने तर्फे मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.सदर मंदिर परिसरात पडझड झालेल्या पायऱ्यांचे ओतिव बांधकाम करण्यात आले आहे तसेच रंग रंगोटी देखील करण्यात आली आहे, ग्रामदेवता दुर्गा मातेच्या मुर्तीस नवरात्र निमीत्ताने रंग रंगोटी करण्यात आली आहे..
सदर कामात छावा संघटनेचे दिपक पवार,हरीष घोरपडे,हर्षल जाधव,दादा पाटील,जिवण मराठे,जितेंद्र पाटील, राकेश जगताप, वैभव पवार,अनिल कोळी, गणेश पवार, भैय्या चौधरी, व गावातील युवा वर्गाने सहकार्य केले.....
*
Tags
news

