शहीद शिरीषकुमार स्मृतीदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.. -मातोश्री सेवा फाउंडेशन नंदूरबारचा उपक्रम-




-नंदुरबार -शहीद शिरीषकुमार व त्यांचे साथीदार यांच्या बलिदान दिनानिमित्त मातोश्री सेवा फाउंडेशन नंदूरबारतर्फ 'ऑनलाइन जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती.देसाईपुरा येथील नवनिर्माण समाज संस्थेच्या कार्यालयात सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले.सदर स्पर्धेत महाविद्यालयीन गटात कु.ऐश्वर्या शास्त्री तर शालेय गटात कु.निशा चौधरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.दोन्ही गटात अनुक्रमे  गीतांजली हंसराज पाटील व प्राची राजेश चौधरी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे निवृत्त अभियंता मधुकर माळी, निवृत्त शिक्षक भीमराव देवरे,नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी,आर्किटेक्ट नरेंद्र जाधव हे उपस्थित होते.कार्यक्रमाला शिरीषकुमार यांचे पुतणे नितीनभाई मेहता सुरतकर व दीपक आर्य यांचे सहकार्य लाभले.यावेळी रवी गोसावी यांनी तंबाखुमुक्त शाळा अभियान विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी मातोश्री सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन माळी,नरेंद्र खवळे,विजय रामकृष्ण माळी, दीपक माळी, विनोद पाटील,विकास माळी उपस्थित होते.परिक्षक म्हणून पुणे येथील प्रवीण महाजन यांनी काम पाहिले. शिक्षक जयेश देवरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार विजय माळी यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने