शहादा - पालघर येथे दिनांक 16/04/2020 रोजी दोन साधूंची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली. यामध्ये अनेकांनी पूर्वनियोजितपणे कट रचून निष्पाप साधूंची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
श्री राजपूत करणी सेना महाराष्ट्र तर्फे पालघर येथील दोन निष्पाप साधूंच्या हत्येचा पूर्ण भारतभरातून निषेध करण्यात आलेला आहे. जनतेमध्ये दोन निष्पाप संतांची हत्या करणा-या आरोपीविरुद्ध प्रचंड राग आणि संताप आहे. निष्पाप निरपराध संतांची हत्या होणे हे महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीला लागलेला काळीमा आहे. निष्पाप संतांच्या हत्येची महंत, साधू, वारकरी संप्रदायांनी तीव्र निषेध केलेला आहे.श्री राजपूत करनी सेना माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य यांना या निवेदनाद्वारे मागणी करते कि, निष्पाप साधुसंतांच्या हत्या ही महाराष्ट्र राज्यात भुषावह नाहीच, या हत्याकांडामधे अजून धर्मांध शक्ती आणि समाजकंटकांचा सहभाग आहे का? याचा तपास होणे अत्यावश्यक आहे. या करीता सीबीआय या केंद्रीय यंत्रणेमार्फत तपास करून या समाजकंटकाचा शोध घेऊन त्यांना कायद्याने शासीत करणे आवश्यक आहे.या निवेदनाद्वारे श्री राजपूत करनी सेना आपणास मागणी करते की, पालघर हत्याकांडामधील सर्व आरोपी निष्पन्न करण्याकरिता हा खटला सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरीत करावे, अन्यथा राजपूत करणी सेना महाराष्ट्रभर आंदोलन करेल आणि याची होणारी सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील.
तरी याची गंभीर दखल घेऊन पालघर हत्याकांडातील प्रकरण हे सीबीआय या केंद्रीय तपास यंतणेकडे वर्ग करावे आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश करावे. या वेळी श्री राजपूत करणी सेनेचे भरतसिंह राजपुत
शहादा तालुका कार्याध्यक्ष,.सुमितसिंह राजपुत
युवक तालुका प्रमुख, भुषणसिंह गिरासे-राणा
युवक तालुका मीडिया प्रमुख,पृथ्वीराजसिंह रावल,युवक तालुका कार्याध्यक्ष,मेहुलसिंह राजपुत युवक तालुका उपाध्यक्ष,जितेंद्रसिंह राजपुत,मयुरसिंह राजपुत,ललित राजपुत इ उपस्थित होते.
Tags
news
