होलनांथे गावात करणी सेनेच्या विविध पदनियुक्ती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न






होलनांथे - दि.11/9/2020 रोजी धुळे जिल्हा शिरपुर तालुक्यातील होळनांथे गावात नांथे येथे महाराष्ट्र राज्य करणी सेनेचा पदाधिकारी नियुक्ती व मार्गदर्शन चा एक छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.दिनेशसिंह जाधव (महाराष्ट्र प्रवक्ता करणी सेना व श्री.योगराज काटे (किसान करणी सेना) हे होते.या वेळी कार्यक्रमात  राजपुत समाज बांधव उपस्थित होते. या वेळो शिरपूर तालुका अध्यक्ष पदावर नांथे गावचे माजी सरपंच महेंद्रसिंह माणिक सिह राजपूत, किसान करणी सेनेच्या जिल्हा सरचिटणीस पदावर स्वप्नील लखेसिंह जाधव (राजपूत) यांची तर शहादा तालुका अध्यक्ष सोशल मीडिया या पदावर कल्पेश सरकारसिंह राजपूत यांची तर धुळे जिल्हा सरचिटणीस पदावर हिमतसिंह राजपूत, जातोड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.


या वेळी प्रमुख पाहुणे दिनेश राजपूत यांनी युवकांना करणी सेना , सेनेची वैशिष्ट्य, उद्दिष्ट व कार्य प्रणाली या बाबत अवगत केले. करणी सेनेच्या मद्यमातून अन्याया विरुद्ध लढण्याचे,सर्व समाज घटकांचे रक्षण करण्याचे आवाहन केले.तसेच नांथे गावात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे या कामाची पाहणी करून या कामा बाबत समाधान व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यकर्माचे सूत्रसंचालन प्रा. बी.पी.राजपूत यांनी केले तर प्रास्तविक महेंद्रसिंह राजपूत, महाराष्ट्र उपाध्यक्ष शोषल मीडिया यांनी केले .तर आभार प्रदर्शन बापूसाहेब राजपूत यांनी केले या वेळी शिवाजी राजपूत शिवा पैलवान करणी सेना धुळे जिल्हाध्यक्ष, महेंद्र सिंह राजपूत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष करणी सेना सोशल मीडिया, जयपाल सिंह राजपूत सरपंच ग्रामपंचायत नांथे, प्रदीप सिंह राजपूत उत्तर महाराष्ट्र मुख्य सल्लागार करणी सेना ,भावेश राजपूत अध्यक्ष युवा करणी सेना शिरपूर, तेजस राजपूत उपाध्यक्ष युवा करणी सेना शिरपूर ,भटू सिंह राजपूत तंटामुक्ती अध्यक्ष नांथे,गजेंद्र सिंह राजपूत धुळे जिल्हा अध्यक्ष करणी सेना सोशल मीडिया ,जितेंद्र सिंह राजपूत नांथे, रोशन राजपूत उपाध्यक्ष युवा करणी से।सेना, धुळे जिल्हा ,जितेंद्र पवार हेमराज राजपूत बापूसाहेब राजपूत, महेंद्र राजपूत मांजरोद ,वासुदेव राजपूत ,नितीन राजपूत ,नेपाल राजपूत ,गोपाल राजपूत ,वीरपाल राजपूत  ,ओमेन्द्र सिंह राजपूत ,करण राजपूत ,इत्यादी करणी सेना सदस्य व युवक व समाज बांधव उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने