शेती,संस्कृती, परंपरा औदार्य व विश्वास या गुजर समाजाच्या पंचसूत्री - ना. गुलाबराव पाटील




        पूर्वीच्या काळी कमी शिक्षित असलेला गुजर समाज आज प्रगतीच्या  व विकासाच्या वाटेवर आहे. त्यामुळे असं कुठलंही क्षेत्र नाही जेथे आपला माणूस नाही. शेती संस्कृती चाली भाषा उदारपणा, औदार्य वh दातृत्व, विश्वासार्हता आणि लोकांच्या कमावलेला विश्वास ही गुर्जर समाजाची ओळख असून गुजर समाजाचे शेती संस्कृती परंपरा औदार्य आणि विश्वास या पंचसूत्री आहेत असे  दि.३० आॕगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दोडे गुर्जर  समाज विकास मंच आयोजित दोडे गुजर समाज विकास मंथन वेबिनार च्या उद्घाटनाप्रसंगी  महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुर्जररत्न ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले  त्यावेळी  बोलत होते .
 उद्घाटनीय विचार व्यक्त करताना कोरोना च्या काळातील सदुपयोग म्हणून बुद्धिवंत समाज रत्नांनी समाजाचा  विकास व्हावा म्हणून प्रयत्न करण्याचे आवाहन केले तसेच आपण ज्या समाजात ज्या संस्कृतीत जन्माला आलो येथे मोठे झालो संस्कृती व समाज यांना न विसरता संस्कृती व समाज हीच संपत्ती आहे म्हणून मागे पडलेले आहेत त्यांना पुढे आणावे ती धमक गुजरांमध्ये आहे ती त्यांनी आज दाखवण्याची वेळ आलेली आहे. विचार मंथन उद्घाटनीय पुष्प गुंफताना  आजच्या वेबिनार विषयानुसार सामाजिक विकासात महिलांचा सहभाग या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी राजेंद्र पाटील यांनी गुजर समाजातील शिक्षणावर चे व उद्योगावर चे लक्ष केंद्रित करताना स्त्री शिक्षण समृद्धी आणि स्त्रीमधील सुसंस्कृतपणा यांच्या विचार केला तर निश्चितच समाज पुढे जाईल स्त्रियांनी तीन पिढ्यांमधील संवाद वाढविण्यासाठी मुलांवरचे संस्कार केले पाहिजेत आई शिकलेली असेल तर प्रतिकूल परिस्थितीत आपले अनुभवातून समृद्ध असे संस्कारांची आणि संस्कृतीची परंपरा निर्माण करणार आहे. आईच्या योगदान व आईच्या संस्कारातून आम्ही घडलो स्री अर्थात  आई सर्व मुलांच्या भविष्याला  जबाबदार असते असेही त्यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर संसाराला आकार देण्यासाठी स्त्री-पुरुष समान कार्य करू शकतात समन्वय संतुलन व सहकार्यातून हे शक्य होते आणि म्हणून स्त्रियांच्या योगदाना शिवाय समाज प्रगती करू शकत नाही शेतातही बरोबरीचे काम स्त्रिया करतात कुटुंब समाजासोबत मानवाच्या विकासामध्ये स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून प्रत्येक माणूस आत्मचिंतन आच्या पातीवर पातळीवर आपले अस्तित्व काय आहे याचं सिंहावलोकन करताना दिसतोय म्हणून समाजातील कुटुंब समाज यांच्या अस्तित्वाची जाण लक्षात घेऊन कुटुंबातील परिपक्व आंतर संवाद घडून येण्यासाठी महिलांनी कार्य करण्याचे आवाहन केले . उद्घाटन या कार्यक्रमात सप्ताहभर चालणाऱ्या बिनाच्या नियोजनाविषयी ची माहिती प्रास्ताविकातून कार्यक्रम प्रमुख निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ए जी पाटील यांनी दिली. यावेळी प्रास्ताविकात समाज जागृती हाच मुख्य उद्देश या वेबिनार चा असून समाज शेतीप्रधान ते कडून सर्व क्षेत्रात प्रज्ञावंतांमुळे प्रगतीच्या दिशेने जात आहे नाही समाजासाठी अभिमानास्पद बाब असून स्वकर्तृत्वाने समाज बलवान केला आहे. समाज साहित्य व कलेच्या संवर्धना त आपण मागे आहोत परंतु याचा सर्व  इतिहास लिहिला गेला पाहिजे भाषा संवर्धन झाले पाहिजे म्हणून प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाज भाषा व संस्कृती टिकावी म्हणून समाजातील प्रज्ञावंत यांनी पुढे येऊन विचार करावा या उद्देशाने समिती स्थापन करण्यात आली माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी प्राचार्य डी. आर.पाटील ,विलास पाटील मोहन चव्हाण ,प्राचार्य एच एम.पाटील सर ,महेश देशमुख  यांच्याशी चर्चा करून ही समिती स्थापन झाली आणि विविध विषयांचा विचार केला. चव्हाण  सरांनी खूप मेहनतीने हे सर्व नियोजन केलेले आहे. समाजातील सर्वच तरुण सुशिक्षित ,महिला ,शेतकरी व्यापारी व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
  आजच्या मंथन आतंरजाल वेबिनार ला समाजातील अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुनील दादा चौधरी.,  शास्त्रज्ञ   प्राचार्य डॉ. एल ए पाटील सर ,दोडे गुजर सेवा संस्थान चे अध्यक्ष चंद्रशेखर दादा पाटील , प्राचार्य डाॕ.डी.आर.पाटील,मुख्याध्यापक  विलास पाटील सर चोपडा,ऋणानुबंध परिवाराचे सर्वश्री महेशबापू देशमुख 
आदर्श शेतकरी कांतीलाल पाटील , ईश्वर पाटील,  विश्वस्त प्रा. निश्चल पाटील ,धुळे दोडे गुजर संस्थांचे माजी अध्यक्ष वासुदेव पवार, जळगाव येथील त्रिमूर्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा दोडे गुजर सेवा संस्थांचे विश्‍वस्त प्रा.मनोज पाटील सर यांनी पाटील सुरेश पाटील वाघुळकर सुरत शिवाजी पाटील अर्जुन पाटील सौदी अरेबिया येथून विलास पाटील तोंदेकर  के एम पाटील,हुकुमचंद पाटील विश्वनाथ पाटील ईश्वर पाटील अरुण पाटील माणगाव,विठ्ठल पाटील सर वाशिंद,सोपान पाटील,विद्या पाटील,कृषिभूषण प्रकाश पाटील,प्रल्हाद पाटील,डी.पी.पाटील, अनिता चौधरी ,डाॕ,अरुण पाटील, रायगड डी. एन.चौधरी ,दिलीप पाटील पी.एच.चव्हाण कुंजन पाटील, आदी  मान्यवरांनी वेबिनार वा झूम अॕप वर व आॕनलाईन युट्युब वर सहभाग घेऊन समाजातील या आगळ्यावेगळ्या अभिनव उपक्रमांच्या कौतुक केले.  आजच्या उद्घाटन विनार सत्राचे सूत्रसंचालन राष्ट्रभक्त मोहन चव्हाण सर वडी कर यांनी केले तर प्रास्ताविक मंथन वेबिनार संकल्पनेचे प्रमुख सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ये जी पाटील यांनी केले तर आभार शिरपूर येथील माध्यमिक शिक्षक तथा पुण्यनगरी प्रतिनिधी संतोष पाटील अर्थे कर यांनी केले.या उपक्रमाचे प्रणेते प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील शहादा यांनी तांत्रिक साहाय्य सांभाळून वेबिनार यशस्वी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने