धुळे - पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे सिव्हिल येथील प्रथम स्त्री जन्माचे तिच्या नावे 7000 रु FD करण्यास रक्कम देऊन केले स्वागत तसेच मातोश्री वृद्धाश्रमास 70 वृद्ध व्यक्तीं करिता 200 मास्क 20 Ltr सॅनिटायझर तसेच फळ वाटप करण्यात आले *
धुळे शहर : युगनायक पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने विविध उपक्रम आयोजित करत सेवा सप्ताह साजरा केला जातो आहे याच पार्श्वभूमीवर धुळे येथील हिरे मेडिकल सिव्हिल हाॅस्पीटल येथे आरती अनिल भिल या महिलेने 17 तारखेस स्त्री अर्भकास जन्म दिला त्यांच्या स्वागता साठी आपले पंप्रधान युगनायक मोदीजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या नावे 7000 रकमेची FD करण्याकरिता रक्कम सुपूर्द करण्यात आली.
तसेच मातोश्री वृद्धाश्रम येथील 70 वृद्धास पुरणार एवढे मास्क सॅनिटायझर व सफरचंद केळी यांची वाटप करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या स्थानी विशेष उपस्थिती धुळे शहर भाजप अध्यक्ष अनुप भैय्या अग्रवाल, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी जयश्री ताई अहिरराव मा.महापौर (प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा) धुळे शहर भाजप उपाध्यक्ष ओम भैय्या खंडेलवाल, युवा मोर्चा प्रदेश सचिव हर्षल विभांडीक तसेच युवा मोर्चा धुळे ग्रामीण व धुळे शहर अध्यक्ष आशुतोष पाटील,कुणाल चौधरी, सरचिटणीस सागर कोडगिर,निनाद पाटील अमृता पाटील-युवती प्रमुख मंडळ अध्यक्ष सचिन कायस्थ,गौरव बोरसे शहर उपाध्याक्ष मकरंद अंपळकर महेश निकम , सुशांत यादव उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यशवर्धन कदमबांडे व रोहित चांदोडे यांनी केले.
विशेष सहकार्य : डॉ अमिता रानडे (हिरे मेडिकल) श्री धीरज धनगर (मातोश्री वृद्धाश्रम) यांचे लाभले.
Tags
news
