*शिंदखेडा / शिरपूर (प्रतिनिधी)* : नुकत्याच धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने पक्षप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते खासदार श्री. संजय राऊतसाहेब, उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री. रविंद्र मिर्लेकर साहेब व धुळे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. बबनराव थोरातसाहेब यांच्या मार्गदर्शनाने खालील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
उपजिल्हाप्रमुख : शानाभाऊ सोनवणे (शिंदखेडा विधानसभा), भरत राजपूत (शिरपूर विधानसभा). तालुकाप्रमुख : गिरीश वा. पाटील (शिंदखेडा तालुका), दिपक शि. चोरमले (शिरपूर तालुका), अत्तरसिंग पावरा (शिरपूर पश्चिम). उपजिल्हासंघटक : कल्याण बागल (दोंडाईचा विभाग). तालुका संघटक : योगेश सूर्यवंशी (शिरपूर तालुका). शहरप्रमुख : सागर देसले (शिंदखेडा). तालुका समन्वयक : विनायक पवार (शिंदखेडा). नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री. अतुल सोनवणे व जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांनी अभिनंदन केले आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे विचार घराघरापर्यंत पोहचविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
Tags
news
