जात आमच्या नाही तुमच्या सडक्या मेंदुत आहे , आमदार अनिल गोटे यांचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर

 



 धुळे प्रतिनिधी - सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय विशेष गाजत असून या विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मी ब्राम्हण असल्यामुळे आपल्यावर टीका होत आहे असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत .त्यांच्या विधानाला प्रतिक्रिया देण्यासाठी धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी एक पत्रक काढून त्यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. सदरच्या पत्रकात त्यांनी  मनाची नसेल  तर जनाची लाज वाटू द्या , आचार्य अत्रे, नानासाहेब डांगे, बाबा आमटे इ.नेत्यांची  जात कधी महाराष्ट्राने पाहिले नाही, आपल्या कपटी, लबाडी दगलबाज इत्यादी गुणांच्या साक्षात्कार महाराष्ट्र झाल्याने विरोध, ब्राह्मणांनाच नव्हे  तर फडणविस यांना अशा शब्दात प्रतिक्रिया दिली असून जात आमचा नाही तुमच्या सडक्या मेंदूत आहे .मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडू नका असे सरकारी वकिलांना सांगताना आपणास लाज कशी वाटली नाही ?  शिवाय धनगरांना आरक्षण दिले नाही तारखा दिल्या, आपण फसवले नाही असा एखादा समाज सांगा असे देखील प्रतिउत्तर त्यांनी दिले आहे .माझ्याशी केलेल्या दगलबाजी ,  गद्दारी आणि बेईमानी ची  आठवण आपणास होते का? असे देखील टोले अनिल गोटे यांनी फडणवीस यांना दगावले आहेत.
 देवेंद्र फडणीस यांच्या मनात सुप्त जातिवाद आहे .असे मी 3 वर्षांपासून जाहीरपणे सांगत होतो. त्यांच्या सडक्या मेंदूतून जातीवादाने डोकेवर काढले आपल्या लबाडी ,खोटेपणा जवळच्या जिवलग सहकार्याची दगलबाजी केसाने गळा कापण्याची असण्याची जाणीव हळूहळू का होईना महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राला झाली .महाराष्ट्राच्या राजकारणात जातीवाद नाही असे नाही, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे नाही. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा कुटील डाव उधळून टाकणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या नेतृत्वातील बहुसंख्ये
नेते ब्राह्मण होते .श्रीपाद अमृत डांगे आचार्य अत्रे इत्यादी नेते काय आदिवासी दलित होते का ?संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उभ्या महाराष्ट्राने ब्राह्मण समाजातील नेत्यांचे नेतृत्व  हृदयाच्या शेवटच्या टोकापासून स्वीकारले. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात कधीही जातीवाद आला नाही. महाराष्ट्राचे सामान्य जनतेच्या मनात जातीय वाद असता तर  शरद जोशी शेतकऱ्यांचे नेते होऊ शकले नसते . याची समज राजकीय हतबलता यामुळे व स्वतःच्या व गुणांमुळे राज्यातील जनतेच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आली तर तो भाग्याचा दिवस असेल असे खडे बोल संघाच्या मुशीत तयार झालेले जनसंघाचे संघटनमंत्री भाजपचे माजी आमदार यांना अनिल गोटे यांनी सुनावले आहे.

 आपल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी जातीचा आधार घेण्यापेक्षा अंतर्मुख होऊन जरा एकदा स्वतः गुणांपेक्षा अवगुणाची  संख्या किती पटीने वाढली आहे याचा स्वताच्या मनाशी प्रामाणिकपणे विचार करावा. माझ्या लिखाणातील प्रामाणिकपणे हा शब्द त्यांनी समजून घ्यावा अत्यंत कपटी, लबाड खोटारडे ,दगलबाज केसाने गळा कापताना स्वतःच्या डोळ्यांमध्ये अश्रू न येणारे इत्यादी गुणांचा एकत्रित वास्तव्य असणारे व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांच्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडात किमान तीन वेळा तरी यांच्या जातीचा उल्हेख झाला असेल. त्या वेळेला संघ संस्कारात घडलेल्या भाजपमधील आमदार यापैकी एकही आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला धावला नाही. मी जातीने धनगर असून तीन वेळा विरोधकांचा रोष माझ्यावर ओढून घेतला. भाजप मधील आज विदर्भातील काही नेते अण्णां तुम्ही कशाला अंगावर घेता असे मला टोचून बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा सारख्या राज्यातील सर्वोच्च पदावर असलेला नेता किती हलकट आणि हलक्या कानाचा असू शकतो याचा आदर्श फडणवीस  व्यतिरिक्त दुसरा कोणी असू शकत नाही.रात्री 10 वाजेपासून तब्बल चार-साडेचार तास माझ्याशी चर्चा केली सांगितले देवेंद्रजी तुम्हाला अडचण असेल तर मला सांगा मी वेगळा विचार करतो ढोंगी आणि लबाड माणूस मला म्हणाला गोटे साहेब तुम्ही आमचे असेट आहात उद्या पत्रकार परिषदेत आपल्या नावाची मी घोषणा करतो तुम्ही निश्चिंत राहा. संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या हवाली करणाऱ्या कनोजी ब्राम्हणपेक्षा देवेंद्र फडणवीस कैक पटीने जास्त दगलबाज निघाले. पत्रकार परिषदेत घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सट्टा, मटका, रॉकेल माफियांच्या डांबर सम्राट ,हत्या ,जीवाशी ठार मारण्याचा गुन्हा दाखल केलेल्या चारित्र्यवान  35 गुंडांना पवित्र करून भाजपमध्ये घेतले. त्यांना तिकिटे दिली. उमेदवारी अर्ज भरायला फक्त 36 तास शिल्लक होते. माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले अण्णासाहेब तुमच्यावर विश्वास टाकला त्या देवेंद्र फडणवीस यांनी केसाने गळा कापला म्हटलं आपली फसवणूक केल्यानंतर फडणवीस यांचा चेहरा कसा दिसतो केल्याबद्दल अपराधीपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर आहे का? हे पाहण्यासाठी  त्यांना भेटलो मंडपात बसलेला गणपती चेहऱ्यावरचे भाव नसतात अशी भावना शून्य, पार्ले बिस्कीट पुड्यावर असलेल्या बालकाप्रमाणे निरागस चेहर्याने माझ्याशी बोलत होते .संताप तर इतका झाला होता की 5 ऑगस्ट 1972 रोजी तत्कालीन मंत्री हरी गोविंद वर्तक यांच्या कानशिलात घेऊन मी माझ्या संतापाची देशी झलक दाखवली होती तशी झलक देवेंद्र चेहऱ्यावर दाखवून द्यावी असे माझ्या मनात उफाळून आले होते परंतु अजूनही मला आज ही माझीच  आश्चर्य वाटते मी स्वतःवर कसा ताबा मिळवला आणि का?
 अर्थात त्यांच्या कुठल्याही भानगडीत नसलेल्या केवळ विकासाचे राजकारण करणाऱ्या कुठल्याही गटात सहभागी न होणाऱ्या आपल्याच पक्षातील धनगर समाजातील लोकांची फसवणूक का केली असे पत्र लिहून विचारले अर्थात नैतिक ते पेक्षा नैतिकतेची पातळी उंच असणारे बिचारे फडणवीस उत्तर देऊ शकले नाहीत. 
जातिवाद महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नाही तर तुमच्यावर  अवगुणांचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला झाला आणि म्हणून तुम्ही टीकेचे लक्ष होत आहात.
 त्यांनी पुढे म्हटले आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात व सभागृहाबाहेर तुम्ही काय कमी बोंबलून  सांगत होते की मराठा समजाला असे वाटावे की देवेंद्र एकमेव माणूस या गर्दीतून आपल्यालाबाहेर काढेल.  त्याच वेळेला रात्री 10 नंतर वर्षा नाईटक्‍लबमध्‍ये नाईट क्लब के सदस्य गिरीश महाजन ,जय कुमार इत्यादी बिगर मराठा नेत्यांना घेऊन बसत होते कट कारस्थान शिजत होते .त्यावेळी सरकारी वकील आशुतोष कुंभ कोणी यांना आदेश द्यायचे की मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडू नका इतका हलकट  कपटी  मुख्यमंत्री महाराष्ट्राने यापूर्वी पाहिला नाही .मी म्हणत नाही कारण आम्हाला आरोप करायची जागा ठेवली नाही . आशुतोष कुंभकोणी यांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितले आहे. माझे आवाहन आहे देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थेंबा इतका ही प्रामाणिक पणा शिल्लक असेल तर महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या खरं बोलतात तुम्ही खरं बोलतात कुंभकोणी.
 धनगर समाजाच्या केलेल्या फसवणुकीची कथा यापेक्षा भयानक आहे .धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कारण नसताना टाटा सोशल इन्स्टिट्यूट कडे पाठवला. अहवाल मुद्दाम येऊ दिला नाही.आलेला अहवाल  दडून ठेवला, धनगर समाजाला आरक्षण मिळता कामा नये अशी मजबूत खुंटी मारून ठेवली. एवढा सज्जन ब्राम्हण मी  उभ्या आयुष्यात पाहिला नाही .केवळ मराठ्यांचे नव्हे तर धनगरांच्या सुद्धा आरक्षणाची वाट लावण्याचे सर्व श्रेय देवेंद्र फडवणीस यांचे कोणी घेऊ शकत नाही. माझ्या साधा प्रश्न आहे की मराठा धनगर आरक्षणाची पूर्ण विल्हेवाट लावून वाटोळे केल्यानंतर देवेंद्र फडणीस यांच्या अपेक्षा काय त्यांच्या आरत्या ओवाळून करावी अशी आहे का ? खुशमस्करे,पगारी कार्यकर्त्यांची तैनाती फौज आणि विशिष्ट पत्रकारांच्या गट हाताशी धरून हवा भरून निर्माण केलेला बलुन आता हळूहळू खाली उतरत आहे .अर्धशतकाच्या राजकीय वाटचालीत महाराष्ट्राच्या राजकारणात तुमच्या इतके तिरस्करणीय व्यक्ती मला भेटली नाही. आपण एवढे घृणास्पद तिरस्करणीय का ठरतो आहोत ? हा  प्रश्न एकदा स्वतःला विचारा असा टोला देखील अनिल गोटे यांनी मारला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने