शिरपूर चे उद्योगपती तपन भाई पटेल यांचे अपघाती निधन, पटेल परिवारावर काळाचा घाट शिरपूर तालुक्यात शोककळा




शिरपूर ता.30 : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एकला अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएमएस कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार (एमएच 18 एएक्स 8) च्या इंजिनचा स्फोट झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू केल्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले.


शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र, माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होते.


या घटनेची माहिती कळताच युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू केले गेले मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.या दुर्घटने मुले पटेल परिवार दुःखाचा डोंगर कोसळला असून तालुक्यात शोककळा पसरली आहे 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने