थाळनेर गावात अमरधाम बांधकाम कामाचा शुभारंभ




थाळनेर - थाळनेर येथील कित्येक वर्षापासुन प्रलंबीत असलेला अमरधामचा प्रश्न हा मार्गी लागला असुन त्यासाठी सन्माननिय अमरीशभाई पटेल साहेब यांच्या सहकार्याने मा आमदार काशिराम दादा पावरा यांच्या निधीतुन दहा लाख रुपये निधी या कामासाठी मिळालेला आहे . या कामाची सुरूवात झाली असुन  लवकरच थाळनेर गावाला सुसज्ज अमर धाम लोकसेवेत लोकार्पण होणार आहे . या बाबत अनेक वर्षांपासून गावकरी मागणी करत होते .या कामा साठी निधी उपलब्ध झाला त्याबद्दल सरपंच उपसरपंच सन्माननिय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी मा अमरीशभाईसाहेब व मा काशिराम दादा पावरा यांचे आभार मानले आहेत यापुढेही मा अमरीशभाईसाहेबांच्या आशिर्वादाने थाळनेर गावातील विकास कामे ही होत राहतील असे सरपंच प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने