करणी सेनेचे तालुकाध्यक्षपदी समाधान राजपूत




शहादा (प्रतिनिधी) :- असलोद (ता. शहादा) येथील समाधान राजपूत यांची नुकतीच करणी सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. निवडीचे पत्र नुकतेच करणी सेनेचे महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष गिरीश परदेशी यांच्या स्वाक्षरीने दिले आहे. या निवडीचे शहर व तालुक्यासोबत ग्रामीण भागात अभिनंदन केले जात आहे. या निवडीबद्दल समाधान राजपूत यांचे राजपूत समाज बांधव व सोशल मीडियात मित्र परिवारातर्फे अभिनंदन होत आहे.    करणी सेनेचे महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्ष गिरीश परदेशी, शहादा- तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, सामाजिक कार्यकर्ते राजू बाविस्कर, पत्रकार कल्पेश राजपूत, किरण सनेर, दिलवर गिरासे, लोटन गिरासे, सागर गिरासे आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने