शिरपूर -शासनाच्या आरोग्य सेवेत औषध निर्माता हे पद महत्वाचे आहे. या पदास केंद्र शासनाने फार्मसी अँक्ट १९४८ नुसार कायदेशीर संरक्षण दिले आहे. परंतु, अशा पदाची महाराष्ट्र शासनाने दयनीय अवस्था केली असून औषध निर्माण अधिकारी मागील ३० वर्षांपासून सनदशीर मार्गाने मागण्या करीत आहेत. परंतु त्यावर कोणतीही ठोस भुमिका घेण्यात आलेली नाही. त्याकडे आरोग्य विभाग कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
औ.निर्माण अधिकारी यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलनं, काळ्या फिती लावून कामं करणे, आरोग्य (राज्य) मंत्री यांना निवेदन दिली. मिटींगा आयोजित करून आरोग्य विभागास पुर्तता करण्याची सुचना देऊनही पदोन्नती, सेवा प्रवेश नियमात सुधारणा, कर्तव्य आणि जबाबदारीत सुधारणा, वेतन निश्चिती यापैकी एकही मागणी पुर्ण झालेली नाही. आता तरी आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासन औषध निर्माण अधिकारी यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न औ.निर्माण अधिकारी संघटनेची जिल्हा शाखा - धुळे वतीने जिल्हाध्यक्ष - श्री. हेमंत भदाणे, उपाध्यक्ष - श्री. मुकेश हासवाणी, सचिव - श्री. कुणाल मंगळे, कोषाध्यक्ष - श्री. सुनिल महाजन, शिरपूर ता. प्रतिनिधी - श्री. मनोहर सुर्यवंशी, श्री. संतोष देशपांडे, श्री. श्याम पावरा, श्री. संतोष पावरा आदींनी केला आहे.
राज्यातील तब्बल साडेपाच हजार औषध निर्माण अधिकारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि. २१/०९/२०२० रोजी राज्यभर काळ्याफिती लावून कामं केलीत. याबाबत जिल्हा शाखेने आंदोलनाची दिशा निश्चीत केली असून दि. २५/०९/२०२० रोजी "जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त" मा.जिल्हाधिकारी सो. , मा.मुख्यकार्यकारी सो. जि.प. धुळे व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी सो. जि.प.धुळे यांना निवेेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्यांबाबत सकारात्मक परिणाम न दिसल्यास ३ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर एका दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जिल्हा शाखा - धुळे यांनी स्पष्ट केले आहे.
आपलाच :-
श्री. संतोष नारायण पावरा ( औषध निर्माण अधिकारी, प्रा.आ.केंद्र - वकवाड, शिरपूर )
Tags
news

