पालघर येथील संतांच्या हत्येची सीबीआय चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करा. श्री. राजपूत करणी सेनेची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर.




शहादा (प्रतिनिधी) :-  पालघर येथील संतांच्या हत्येची सीबीआय चौकशी करून आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी श्री राजपूत करणी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे . याबाबत तहसीलदार डॉ मिलींद कुळकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे . सदरच्या निवेदनात म्हटले आहे की पालघर येथे दि .१६ एप्रिल रोजी दोन साधूंची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली . यामध्ये अनेकांनी पूर्वनियोजितपणे कट रचून निष्पाप साधूंची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे निवेदनात म्हटले असून श्री राजपूत करणी सेना महाराष्ट्रातर्फे पालघर येथील दोन निष्पाप साधूंच्या हत्येचा पूर्ण भारतभरातून निषेध करण्यात आलेला आहे . यामुळे या प्रकरणाचा सीबीआय या केंद्रीय यंत्रणेमार्फत तपास करून समाजकंटकाचा शोध घेवून त्यांना कायद्याने शिक्षा देण्यात यावी . अन्यथा राजपूत करणी सेना महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे . निवेदनावर भरतसिंह राजपूत , सुमितसिंह राजपूत , भुषणसिंह गिरासे , पृथ्वीराजसिंह रावल , मेहुलसिंह राजपूत , जितेंद्रसिंह राजपुत , मयुरसिंह राजपुत , ललित राजपूत आदींच्या सह्या आहेत .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने