शिरपूर- येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते तसेच प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्त्व स्व. रसिकलाल चुनिलाल पटेल (पप्पाजी) यांच्या 20 व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये "हे राम" च्या भजन संगीत सोबत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी चेअरमन भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, योगेश भंडारी व पदाधिकारी यांनी गुलाब पुष्प वाहून पप्पाजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाला कैलासचंद्र अग्रवाल, हसमुखभाई पटेल, शैलेंद्र अग्रवाल, नाटूसिंग गिरासे, डॉ. उमेश शर्मा, श्रेणीक जैन, डॉ. सुधीर गुजराथी, मोतीलाल माळी, वासुदेव देवरे, हर्षल गिरासे, संतोष माळी, राजेंद्र पाटील, भुरा राजपूत, रज्जाक कुरेशी, सलीम खाटीक, राजू एजंट, संजू कोळी, दिलीप पटेल, जाकीर शेख, वसंत पावरा, श्यामकांत ईशी, संजय चौधरी, भालेराव माळी, सुरेश अहिरे, अनिल आखाडे, डॉ. एस. जे. सुराणा, डॉ. जे. बी. पाटील, डॉ. डी. आर. पाटील, पी. व्ही. पाटील, डॉ. एस. बी. बारी, डॉ. शारदा शितोळे, डॉ. वैशाली पाटील, एच. वाय. देवरे, जे. एल. चौधरी, निश्चल नायर, स्मिता पंचभाई, नितीन हासवानी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य पी. व्ही. पाटील यांनी केले.
दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या वतीने पटेल परिवार व कमी उपस्थितीत स्व. रसिकलाल चुनिलाल पटेल (पप्पाजी) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग चे पालन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
Tags
news

