सुशांत सिंह राजपूत यांची हत्या की आत्महत्या,? करणी सेना महाराष्ट्र राज्य यांची सीबीआय चौकशीची मागणी



 पुणे प्रतिनिधी -   महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील आपल्या निवासस्थान बांद्रा येथे सुप्रसिद्ध सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केल्याची बातमी 14  जून रोजी प्रसारित झाली होती. या बातमी ने देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. सदरच्या घटनेने देशभरातील राजपूत  समाजाला फार मोठा धक्का बसला असून सदर प्रकरणाच्या मीडिया आणि वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून येणाऱ्या विविध बातम्यांमधून सुशांत यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? याबाबत विविध कयास लावले जात आहेत. सुशांत सिंह राजपूत यांच्या परिवाराने देखील गंभीर आक्षेप उपस्थित केले असून याबाबत गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यामुळे तरुणाईचे आकर्षण आणि आयकॉन आणि राजपूत समाजाचे भूषण सुशांत सिंह राजपूत यांची हत्या आहे की आत्महत्या याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया अध्यक्ष, अध्यक्ष पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराष्ट्र राज्य मराठी  पत्रकार   संघाचे अतुल सिंह परदेशी यांनी एका निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र सिंह जी मोदी यांच्याकडे केली आहे. या पत्रात असे नमूद केले आहे की सुशांत सिंह यांच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची होणारी मागणी अतिशय रास्त मागणी असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी  महाराष्ट्र राज्य करणी सेनेची  मागणी आहे. या राज्यातील सबंध राजपूत बांधवांच्या सरकारवर आणि महाराष्ट्र पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे मात्र तरीदेखील या संपूर्ण प्रकारात अंतिम सत्य काय हे स्पष्ट झाले पाहिजे साठी करणी सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याचे सोशल मीडिया अध्यक्ष अतुल सिंह परदेशी यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आणि आपण या मागणीचा गांभीर्याने विचार करून सदर प्रकरणात सीबीआय चौकशी करून अंतिम सत्य जनतेसमोर  आणाल अशीअपेक्षा देखील व्यक्त केली आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने