कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे अनिल लोहार यांना जनसंवाद व पत्रकारिता या विषयात पीएच.डी पदवी प्रदान...




कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे अनिल लोहार यांना जनसंवाद व पत्रकारिता या विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
अनिल लोहार यांनी "दीनमित्र" कार मुकुंदराव पाटील यांचे अग्रलेख : एक अभ्यास या शिर्षाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र भास्करराव चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, विवेक लोहार, प्र.कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, सिनेट सदस्य अमोल सोनवणे, रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर, जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. जळगाव गाडीलोहार समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक जगन्नाथ काळू गोराणे यांचे ते सुपुत्र व जळगाव मनपाचे नगरसचिव सुनील गोराणे यांचे ते लहान बंधू आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने