तापी नदीकाठच्या गावतील नागरिकांनी सावधानतेचा इशारा




जळगाव, (जिमाका) दि. 29 - जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सध्या धरणाचे चोवीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून तापी नदीपात्रात 1 लाख 21 हजार 430 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

ब-हाणपूर परिसर व धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने संध्याकाळपर्यंत धरणातून अजून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल. असे हतनूर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. महाजन यांनी कळविले आहे. 

तरी तापी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच कोणीही नदी पात्रात जावू नये. आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  यांनी केले आहे.
00000

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने